बळीराजासाठी शाहू महाराजांचं घराणं आक्रमक...
कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध व्यथा जाणून घेण्यासाठी कोल्हापुरातील शाहू महाराजांच्या जनक घराण्याने जनपंचायत अभियान सुरु केलं आहे. या अभियानांतर्गत भाजपचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आणि शाहू जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या ऐकणार आहेत.

सात आठवडे चालणाऱ्या या अभियानाची सुरुवात आज (शुक्रवार 6 नोव्हेंबर) करवीर तालुक्यातील चिंचवाड इथून झाली. यावेळी शेतकऱ्यांनी कर्जमाफी, वाढीव वीज बिल, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अशा अनेक व्यथा मांडल्या.सत्तेत येण्याआधी केलेली मागणी सत्तेत आल्यावर पूर्ण करा. प्रामाणिकपणे कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना 50 हजारांचे अनुदान जाहीर करुन चार महिने झाले. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई त्वरित मिळावी, लॉकडाऊन काळातील संपूर्ण वीज बिल माफ करावे, दरवाढ मागे घ्यावी, अशा प्रमुख मागण्यांकडे घाटगे सरकारचं लक्ष वेधणार आहेत.
बारामती
प्रतिनिधी - रूपेश महादेव नामदास
_________