शहापूर तालुका वनविभागाच्या दहागाव वनात चालतो गावठी दारू तसेच अवैध रेती उपसा,वनविभागाचे मात्र दुर्लक्ष...
शहापूर तालुक्यातील दहागाव वनविभागात मोठ्या प्रमाणात अवैद्य रेती उपसा तसेच गावठी दारू बनवणे या सारखे धंदे राजरोस पणे चालू असल्याचे ग्रामस्थांन चे म्हणणे आहे.

शहापूर वनविभागाच्या दहागाव वनात अगदी रस्त्याला लागूनच रेती उपसा होत असून वनात मोठ्या प्रमाणात रेती (वाळू) ची साठवण केली जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
तसेच वनात मोठ्या प्रमाणात गावठी दारू बनवण्याचे धंदे चालू असून त्याला लागणारे साहित्य ही आढळून आली आहेत , तसेच रेती तस्करनी रेती ची वाहतूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कच्चे रस्ते सुद्धा बनवले असून यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड झाली असेल एकंदरीत या सर्व घटने कडे वनविभाग उघड पणे कानाडोळा करत असेल असे तेथील ग्रामस्थ सचिन मसणे यांचे महणणे आहे.
वनविभाग जर आपल्या संरक्षित वनातून चोरटी वृक्ष तोड रोखू शकते तर चोरटी वाळू तस्करी तसेच गावठी दारू बनवणे या सारखे अवैध धंदे का रोखू शकत नाही असा प्रश्न दहागाव परिसरात व्यक्त केला जात आहे.
शहापूर
प्रतिनिधी - शेखर पवार
__________