तुमचं SBI बँकेत अकाऊंट आहे का?

तुमचं SBI बँकेत अकाऊंट आहे का? तर मग पटकन करा ‘हे’ काम, अन्यथा अडकतील पैसे त्यामुळे SBI ग्राहक आता बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरुन नॉमिनीचे रजिस्ट्रेशन करु शकतात.

तुमचं SBI बँकेत अकाऊंट आहे का?
SBI nominee register

तुमचं SBI बँकेत अकाऊंट आहे का?

तुमचं SBI बँकेत अकाऊंट आहे का? तर मग पटकन करा ‘हे’ काम, अन्यथा अडकतील पैसे
त्यामुळे SBI ग्राहक आता बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरुन नॉमिनीचे रजिस्ट्रेशन करु शकतात. 

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया लोकांना अनेक प्रकारचे खाती उघडण्याचा पर्याय दिला आहे. एसबीआय  मध्ये तुम्ही फिक्स डिपॉझिट  रेकरिंग डिपॉझिट  करंट अकाऊंट, सेविंग अकाउंट  उघडू शकता. मात्र यातील कोणतेही अकाऊंट सुरु केल्यानंतर त्यात nominee रजिस्टर करणे गरजेचे आहे. जर तुम्ही nominee रजिस्टर केला नसेल तर तुम्ही घरबसल्या हे काम करु शकता. 

तुम्ही कोणत्याही बँकेत अकाऊंट उघडले असाल, तर त्यात नॉमिनी रजिस्टर असणे गरजेचे आहे. म्हणजेच जर खातेदाराचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर नॉमिनीला बँकेत जमा असलेली रक्कम मिळते. जर तुम्ही नॉमिनीच्या नावाची नोंद केली नसेल तर तुम्हाला अकाऊंटमध्ये पैसे जमा करताना अडथळे येतात. हीच अडचण टाळण्यासाठी नॉमिनीचे रजिस्टर करणे गरजेचे आहे.

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना नॉमिनी रजिस्टर करण्यासाठी ऑनलाईन पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे SBI ग्राहक आता बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरुन नॉमिनीचे रजिस्ट्रेशन करु शकतात. SBI ने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.

SBI ने ट्वीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, आमच्याकडे एक खुशखबर आहे. आता एसबीआय ग्राहक आमच्या शाखेत भेट देऊन किंवा http://onlinesbi.com वर लॉग इन करून नॉमिनीचे रजिस्ट्रेशन करु शकतात. ही सेवा सेविंग अकाऊंट, करंट अकाऊंट, फिक्स्ड डिपॉजिट, रेकरिंग डिपॉजिट या सर्वांवर उपलब्ध असेल. यामध्ये तुम्ही घरबसल्या नॉमिनीची नोंदणी करु शकता.

Nominee म्हणून तुम्ही आई-वडिल, पती-पत्नीसह आपल्या मुलाचेही नाव नोंदवू शकता. तसेच तुम्ही एका खात्यात एकापेक्षा जास्त लोकांना नॉमिनी म्हणून ठेवू शकता. तसेच जर जॉईंट अकाऊंट असेल तर खातेदाराच्या मृत्यूनंतर प्रथमच नॉमिनीला योग्य हक्क मिळतो.

तसेच तुम्हाला नॉमिन असलेल्या व्यक्तीचे नाव बदलू शकता. नॉमिनी म्हणून नाव बदलण्याचा, जोडण्याचा किंवा काढण्याचा पूर्ण अधिकार खातेदाराला असतो.