ग्राहकांच्या खात्यातून पैसे कसे चोरले जातात

एसबीआयनं पुन्हा एकदा ग्राहकांना अलर्ट दिलाय. ग्राहकांनी अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण फसवणूक करणारे लोक नव्या पद्धतीनं लोकांच्या खात्यातून पैसे चोरतात.

ग्राहकांच्या खात्यातून पैसे कसे चोरले जातात
sbi bank alert

ग्राहकांच्या खात्यातून पैसे कसे चोरले जातात

How money is stolen from a customer's account

 एसबीआयनं  पुन्हा एकदा ग्राहकांना अलर्ट दिलाय. ग्राहकांनी अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण फसवणूक करणारे लोक नव्या पद्धतीनं लोकांच्या खात्यातून पैसे चोरतात.

बँकेने एक व्हिडिओ प्रसिद्ध केलाय. फसवणूक करणारा पहिल्यांदा कॉल करतो आणि म्हणतो की तो एक बँक अधिकारी आहे. तो केवायसी अद्ययावत करण्यास सांगतो. यासाठी ते एक App डाऊनलोड करण्याचाही सल्ला देतात आणि फोनवरूनच दिशाभूल करतात. यानंतर खातेधारकाच्या खात्यातून दुसर्‍या खात्यात पैसे वर्ग केले जातात. 

एसबीआयने एक व्हिडीओ प्रसिद्ध केलाय. त्या व्हिडीओमध्ये फसवणूक करणारा पहिल्यांदा ग्राहकाला कॉल करतो आणि म्हणतो की, मी तुमच्या एसबीआय गृह शाखेतून बोलत आहे. आपल्याला लवकरात लवकर केवायसी अद्ययावत, अन्यथा खाते बंद होईल.

असे म्हटल्यावर ग्राहकही टेन्शनमध्ये येतात आणि त्यासाठी त्यांना कोणती कागदपत्रे द्यावी लागतील हे विचारलं जातं. फसवणूक करणारा आधार कार्ड आणि पॅनकार्ड मागतो. यासाठी आपल्याला शाखेत जाण्याची आवश्यकता नाही. आताच बँकेतून आपले खाते अद्ययावत करत असल्याचं सांगितलं जातं.

यासाठी ग्राहकाने एक App डाऊनलोड करावे लागेल. यानंतर ते फोनचा एक्सेस घेऊन त्यात प्रवेश घेतात. ते त्वरित खाते केवायसी करत असल्याचं सांगतात. जेव्हा कोणताही ग्राहक फसवणुकीच्या बहाण्याखाली असे करतो, तेव्हा अनेक वैयक्तिक माहिती खात्याच्या रकमेसह फोनवरून चोरी केली गेलेली असते.

एसबीआय म्हणतो की, ते कधीही कोणत्याही ग्राहकांना कॉल करत नाहीत आणि त्यांची वैयक्तिक माहिती विचारत नाहीत किंवा फोनवर प्रवेश करण्याची परवानगीही मागत नाहीत.

एखाद्याच्या खात्यातून पैसे चोरी झाल्यास तत्काळ हेल्पलाईन क्रमांकावर 155260 वर कॉल करा. वेळेवर बोलण्याने आपले पैसे वाचू शकतात. या हेल्पलाईनच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत 21 लोकांसाठी तीन लाख तेरा हजार रुपये वाचवू शकलो आहोत. जर आपण ऑनलाईन फसवणुकीचे बळी ठरले असाल तर वेळ न गमावता लगेच हेल्पलाईन नंबर 155260 वर कळवा.

हे पोर्टल भारत सरकारने सुरू केले आहे, जेथे सायबर गुन्ह्याशी संबंधित घटना नोंदविल्या जाऊ शकतात. ही सुविधा पूर्णपणे ऑनलाईन आहे, म्हणून आपल्याला कुठेतरी पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. हे पोर्टल पूर्णपणे सायबर क्राईमसाठी असून, तेथे महिला आणि मुलांवरील गुन्ह्यांकडे अधिक लक्ष दिले जात आहे.

या पोर्टलवर केलेल्या तक्रारी हाताळण्यासाठी कायदेशीर संस्था आणि पोलीस जबाबदार आहेत. हे पोर्टल वापरताना तोडगा सुलभ करण्यासाठी आपल्या तक्रारीशी संबंधित सर्व अचूक माहिती द्यावी.

त्याअंतर्गत ‘सायबर फ्रेंड’ ट्विटर हँडल चालविले जाते, जिथे एखादी व्यक्ती सायबर क्राईमशी संबंधित जागरूकता शिकू शकते.