क्यूआर कोड स्कॅन करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

स्टेट बँकेने ट्विट करुन ग्राहकांना जागरुक होण्याचं आवाहन केलं आहे. कोणताही क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर पैसे मिळत नाहीत .

क्यूआर कोड स्कॅन करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
sbi bank alert

क्यूआर कोड स्कॅन करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

Remember these things before scanning the QR code

स्टेट बँकेने ट्विट करुन ग्राहकांना जागरुक होण्याचं आवाहन केलं आहे. कोणताही क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर पैसे मिळत नाहीत .

भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियानं ग्राहकांसाठी अ‌ॅलर्ट जारी केला आहे. स्टेट बँकेने ट्विट करुन ग्राहकांना जागरुक होण्याचं आवाहन केलं आहे. कोणताही क्यूआर कोड  स्कॅन केल्यानंतर पैसे मिळत नाहीत त्यामुळे दुसऱ्या किंवा अनोळखी व्यक्तीनं पाठवलेला क्यूआर कोड स्कॅन करु नका, असं आवाहन बँकेने केले आहे.

जर, चुकुनही तुम्ही कोड स्कॅन केला तर तुमच्या बँक अकाऊंटमधील पैसे जाऊ शकतात. कोरोना काळात ग्राहकांकडून ऑनलाईन बँकिंगचा वापर वाढल्यानं फसवणुकीचं प्रमाण देखील वाढलं असून बँकेकडे विविध तक्रारी प्राप्त होतात. 

ऑनलाईन बँकिंगचा वापर करताना ग्राहक म्हणून फसवणूक होत आहे किंवा फसवणुकीचा संशय आल्यास थेट बँकेच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधावा आणि त्याबाबतत माहिती द्यावी. फसवणूक होऊ नये म्हणून अशा प्रकारच्या मेसेज पासून सावधनाता बाळगणं आवश्यक आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियानं क्यू आर कोडद्वारे कशी फसवणूक होते हे समजावून सांगण्यासाठी एक व्हिडीओ शेअर केलेला आहे. या व्हिडीओत ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या व्यक्ती कशाप्रकारे क्यू आर कोड पाठवतात आणि पैसे उकळातात हे समजावून सांगण्यात आलं आहे.

ग्राहकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की, आपण ज्यावेळी दुसऱ्याचा क्यू आर कोड स्कॅन करतो तो पैसे पाठवण्यासाठी असतो. आपण स्वत: क्यू आर कोड स्कॅन केल्यास पैसे स्वीकारण्याले जात नाहीत तर ते आपल्या खात्यातून जातात.

एसबीआयने केलेल्या ट्वीटनुसार, Mr. Thinkeshwar हे त्यांची खासगी माहिती नेहमी गुप्त ठेवतात. कोणतीही खासगी माहिती इतरांना देतेवेळी ते दोनदा विचार करतात. तसेच जर अशाप्रकारची कोणतीही घटना घडल्यास कृपया https://cybercrime.gov.in वर तक्रार करा.

एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांनी कोणालाही पॅन कार्ड  माहिती, आयएनबी प्रमाणपत्रे, मोबाइल नंबर, यूपीआय पिन, एटीएम कार्ड क्रमांक, एटीएम पिन आणि यूपीआय व्हीपीए सांगू चुकूनही सांगू नका.

जर तुम्ही कोणतीही खासगी माहिती एखाद्याबरोबर शेअर केली तर तुमचे अकाऊंट खाली होऊ शकते.