अशेरीगडावर मिळाला सातवाहन कालीन शिलालेख... | MBCPR  टीमने शोधल्या दोन हजार वर्षापूर्वीच्या पाऊलखुणा...

अशेरीगड हा इतिहासपूर्ण असा किल्ला असून पोर्तुगीज व छत्रपती संभाजी महाराज इतकाच  इतिहास आत्तापर्यंत  माहिती होता.परंतु  येथील शिलालेख वाचला असता आपणास हा शिलालेख आपणास दोन हजार वर्षांपूर्वीच्या इतिहासात डोकवायला भाग पाडतो.

अशेरीगडावर मिळाला सातवाहन कालीन शिलालेख... | MBCPR  टीमने शोधल्या दोन हजार वर्षापूर्वीच्या पाऊलखुणा...
Satvahana carpet inscription found on Asherigada ... | MBCPR team discovers footprints from two thousand years ago ...
अशेरीगडावर मिळाला सातवाहन कालीन शिलालेख... | MBCPR  टीमने शोधल्या दोन हजार वर्षापूर्वीच्या पाऊलखुणा...
अशेरीगडावर मिळाला सातवाहन कालीन शिलालेख... | MBCPR  टीमने शोधल्या दोन हजार वर्षापूर्वीच्या पाऊलखुणा...
अशेरीगडावर मिळाला सातवाहन कालीन शिलालेख... | MBCPR  टीमने शोधल्या दोन हजार वर्षापूर्वीच्या पाऊलखुणा...
अशेरीगडावर मिळाला सातवाहन कालीन शिलालेख... | MBCPR  टीमने शोधल्या दोन हजार वर्षापूर्वीच्या पाऊलखुणा...

अशेरीगडावर मिळाला सातवाहन कालीन शिलालेख...

MBCPR  टीमने शोधल्या दोन हजार वर्षापूर्वीच्या पाऊलखुणा...

विक्रमगड : दिनांक ११ नोव्हेंबर २०२० अशेरीगड हा इतिहासपूर्ण असा किल्ला असून पोर्तुगीज व छत्रपती संभाजी महाराज इतकाच  इतिहास आत्तापर्यंत  माहिती होता.परंतु  येथील शिलालेख वाचला असता आपणास हा शिलालेख आपणास दोन हजार वर्षांपूर्वीच्या इतिहासात डोकवायला भाग पाडतो. महाराष्ट्र बुद्ध लेणी संशोधन व संवर्धन समुहाने (MBCPR) ह्या गडावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करून येथील इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

पालघर जिल्ह्यातील खडकोना गाव. याच गावाच्या वरती एक गड आहे त्याचे नाव अशेरीगड असे अडवून .
महाराष्ट्र बुद्ध लेणी संशोधन व संवर्धन  ( MBCPR ) समूहाने अशेरीगडावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती.

त्याअगोदर लेणी संवर्धक प्रभाकर जोगदंड  व सिद्धार्थ बाविस्कर, राहुल येलवे यांनी ह्या गडावर जाऊन शिलालेख, पोढी व  अनेक प्रकारची माहिती घेऊन एकदिवसीय कार्यशाळेचे  नियोजन केले होते. या गडाचा इतिहास ८०० वर्षापूर्वीचा सांगितला जातो.परंतु उपरोक्त मिळालेल्या शिलालेखावरून असे निदर्शनास येते की हा गड जवळपास १८०० ते २००० वर्ष म्हणजेच सातवाहन कालीन आहे. सातवाहन राजे हे सम्राट अशोक यांचे मांडलिक होते त्यांनी व्यापाराच्या मार्गावर अनेक लेणींचा निर्मिती केलेली होती.

सातवाहन राज्यांनी महाराष्ट्रात एकूण ९०० लेणी तयार केल्या आहेत, ह्या गडावर जो शिलालेख मिळाला त्यात महाभोज असा उल्लेख आल्यामुळे  असाच उल्लेख कुडा लेणीमध्ये देखील बघायला मिळतो, ह्या शिलालेखातून आपणास सातवाहन कालीन इतिहास उजेडात येतो.

सातवाहन राजे हे व्यापारात अगदी वैभवसंपन्न असे राजे होते. त्यांच्या काळात त्यांनी अनेक गड किल्ल्याची निर्मिती केलेली  दिसते,   येथे संशोधन केले असता येथे ५ ते ६ पाण्याच्या पोढी सातवाहन काळातील येथे आढळून आल्या तसेच अनेक शिल्प अवास्तव स्थितीत आढळले. ह्या शिलालेखाचे संवर्धन होणे गरजेचे आहे, राज्य पर्यटन विभाग व पुरातत्व विभागाने ह्यात लक्ष घालून येथे सातवाहन कालीन शिलालेखाचे बॉडी पायथ्याशी बसवावा  अशी मागणी महाराष्ट्र बुद्ध लेणी संवर्धन व संशोधन समूहाने केली आहे.

नाशिक , कल्याण, पालघर, गोरेगाव व इतर ठिकाणचे अनेक लेणी अभ्यासक या कार्यशाळेत सहभागी झाले होते.यावेळी अशेरीगडावर धम्मलिपी शिक्षक सुनील खरे यांनी सर्व नविन विद्यार्थ्यांना धम्मलिपीचा वर्ग घेऊन
एक तास सातवाहन कालीन धम्मलिपीचे धडे दिले.

त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांकडून सातवाहन कालीन शिलालेख लिप्यांतर करून घेतला. संतोष वाघमारे व प्रभाकर जोगदंड यांनी शिलालेखाचे इत्यंभूत माहिती दिली. यावेळी सुनील खरे , प्रभाकर जोगदंड, संतोष वाघमारे,  विजय कापडणे ,कविता खरे , सुरेखा पैठणे ,अमोल शेलार,  नितीन कांबळे, अंधेरी, आदेश खांडेकर, भालेराव राहुल, राहुल मोरे, राष्ट्रपाल काकडे, रोहित येलवे ,संतोष कांबळे , सुजय जाधव, रमाकांत गायकवाड , राजरत्न जाधव , विनायक जाधव ,प्रतीक ढाले , एड. विकी येलवे , दिवाकर जाधव , प्रविण आप्पा जाधव , दिपक खैरनार , गौतम बनसोडे इत्यादी लेणी/धम्मलिपी  अभ्यासक  उपस्थित होते.

विक्रमगड

प्रतिनिधी - अजय लहारे

___________