कोपरखैरण्यातील सारस्वत बँकेवर दरोडा टाकणाऱ्या दोघा आरोपींना नवी मुंबई पोलिसांनी केली अटक...

आर्थीक चणचण भासू लागल्याने भुषण दिपक चौधरी व  स्वप्निल शेषराव सपकाळ यांनी सारस्वत बँकेमध्ये टाकला होता दरोडा....

कोपरखैरण्यातील सारस्वत बँकेवर दरोडा टाकणाऱ्या दोघा आरोपींना नवी मुंबई पोलिसांनी केली अटक..

पिस्तुल आणि चाकुच्या धाकाने कोपरखैरणे सेक्टर-19 मधील सारस्वत बँकेतील 4 लाख 12 हजाराची रोख रक्कम लुटून नेणाऱ्या भुषण दिपक चौधरी (26) व  स्वप्निल शेषराव सपकाळ (18) या दोघा लुटारुंना चेंबूर येथून जेरबंद करण्यात कोपरखैरणे पोलिसांना यश आले आहे. या दुक्कलीकडून 68 हजाराची रोख रक्कम तसेच गुह्यासाठी वापरण्यात आलेला सुरा व पिस्तुल सारखे हत्यार हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

 भूषण चोधरी याने कोपरखेरने येथे शूज  चे दुकान सुरू करण्यासाठी गाळा भाड्याने घेतला होता परंतु लॉक डाउन सुरू झाले यामुळे आर्थीक चणचण भासू लागली यासाठी भूषण याने बॅंक लुटण्याचे ठरविले ,  यासाठी दोन महिने त्यांनी लोन मिळविण्याच्या बहाण्याने बँकेत रेकी केली। आणि  स्वप्नील सकपाळ च्या मदतीने खोटा पिस्तुल च्या सहाय्याने दरोडा टाकला , पण cctv च्या सहाय्याने पोलिसांनी या दोघांना पकडले , या दोघांनी आपला गुन्हा कबूल केला आहे.

नवी मुंबई 
प्रतिनिधि- सावन आर वैश्य