संभाजी ब्रिगेड विक्रमगड तालुका अध्यक्ष पदी प्रकाश भोये,तर सचिव पदावरती देविदास चौरे...
विक्रमगड तालुक्यातील संभाजी ब्रिगेड पक्षाची बैठक पालघर जिल्हाध्यक्ष तेजसजी भोईर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.बैठकीत संभाजी ब्रिगेड विक्रमगड तालुक्यातील रिक्त पदांवरती नियुक्ती करण्यात आली.
संभाजी ब्रिगेड विक्रमगड तालुका अध्यक्ष पदी प्रकाश भोये,तर सचिव पदावरती देविदास चौरे...
विक्रमगड तालुक्यातील संभाजी ब्रिगेड पक्षाची बैठक पालघर जिल्हाध्यक्ष तेजसजी भोईर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.बैठकीत संभाजी ब्रिगेड विक्रमगड तालुक्यातील रिक्त पदांवरती नियुक्ती करण्यात आली.त्यामध्ये प्रकाश भोये यांना विक्रमगड तालुका अध्यक्षाचा पदभार देण्यात आला आणि देविदास चौरे यांना विक्रमगड तालुका सचिव हा पदभार देण्यात आला.
नवनिर्वाचित विक्रमगड तालुकाध्यक्ष गेल्या काही वर्षापासुन संभाजी ब्रिगेड विक्रमगड तालुका कार्याध्यक्ष म्हणुन आपली जबाबदारीने कार्यरत होते.त्यांची संघटनेसाठी करत असलेली उत्तम कामगिरी व सामान्य जनतेसाठीची तळमळ बघुन त्यांना संभाजी ब्रिगेड विक्रमगड तालुकाध्यक्ष हे पद देण्यात आलं.तसेच तालुका कार्यकरणीच्या इतर पदांनवरतीसुध्दा नियुक्त्या करण्यात आल्या.नियुक्तीच्या वेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष तेजस भोईर,संभाजी ब्रिगेड भिवंडी-पालघर लोकसभा अध्यक्ष संजय पाटील,मराठा सेवा संघ पालघर जिल्हाध्यक्ष सुनिल (नाना) अहीरे तसेच संभाजी ब्रिगेडचे निर्वाचित विक्रमगड तालुका पदाधिकारी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
विक्रमगड तालुका
प्रतिनिधी - अजय लहारे
___________