भाजपा ओबीसी मोर्चा भिवंडी तालुका ग्रामीण  उपाध्यक्ष पदी समर पाटील यांची निवड...

भिवंडी येथील वाटिका हॉटेल मध्ये भाजप ओबीसी मोर्चा पद नियुक्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता.खासदार कपील पाटील,आ.किसन कथोरे,ओबीसी मोर्चा प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये भिवंडी तालुक्यातील समाजसेवक तसेच युवा नेतृत्व समर पाटील यांची भाजपा ओबीसी मोर्चा भिवंडी तालुका उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

भाजपा ओबीसी मोर्चा भिवंडी तालुका ग्रामीण  उपाध्यक्ष पदी समर पाटील यांची निवड...
Samar Patil elected as BJP OBC Morcha Bhiwandi Taluka Rural Vice President ...

भाजपा ओबीसी मोर्चा भिवंडी तालुका ग्रामीण  उपाध्यक्ष पदी समर पाटील यांची निवड...

भिवंडी येथील वाटिका हॉटेल मध्ये भाजप ओबीसी मोर्चा पद नियुक्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता.खासदार कपील पाटील,आ.किसन कथोरे,ओबीसी मोर्चा प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये भिवंडी तालुक्यातील समाजसेवक तसेच युवा नेतृत्व समर पाटील यांची भाजपा ओबीसी मोर्चा भिवंडी तालुका उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

भिवंडी तालुक्यातील  गेल्या अनेक वर्षापासुन  सामाजिक व राजकिय क्षेत्रात समर पाटील कार्यरत आहेत.करोना या महामारी मध्ये गरजु कुटूंबाना अन्नधान्य ,मास्क, सॅनिटाइझर वाटप यासारखे अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. तरुण पिढी बरोबर त्यांचा असलेला जनसंपर्क नक्कीच पक्ष वाढीसाठी उपयोगी ठरणार आहे.

पिळंझे सारख्या लहान गावातील तरुणांची भाजपा ओबीसी मोर्चा भिवंडी तालुका ग्रामीण उपाध्यक्ष निवड झाल्याने परिसरातील तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.यावेळी भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष राम शेलार,भाजपा कार्यकर्ते ज्ञानेश्वर पवार,भरत माळी उपसरपंच परिवली,राजाराम राऊत,दिलीप भोईर,संजय पाटील,ग्रुप ग्रामपंचायत पिंलझे उपसरपंच समिक्षा पाटील,चंद्रकांत पाटील, राजेंद्र पाटील, श्रिरंग चव्हाण आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते  उपस्थित होते.

भिवंडी

प्रतिनिधी - सत्यवान तरे

___________