समता सैनिक दलाकडून कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांना मानवंदना... | संजय कांबळे अमर रहे... घोषणेने गहिवरला परिसर ; २५ स्कॉड सैनिकही गहिवरले...
बीड जिल्हा कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांचे कोरोनाशी झुंज देत असताना उपचारादरम्यान खाजगी रुग्णालयात 3 नोव्हेबर रोजी ते हरले आणी त्यांचा कोरोणाशी झुंज देत असताना त्यांचे निधन झाले. आज ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वा. त्यांच्या बीड येथील निवासस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाकडून त्यांना मानवंदना देण्यात आली.

समता सैनिक दलाकडून कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांना मानवंदना...
संजय कांबळे अमर रहे... घोषणेने गहिवरला परिसर ; २५ स्कॉड सैनिकही गहिवरले...
दि.५ बीड जिल्हा कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांचे कोरोनाशी झुंज देत असताना उपचारादरम्यान खाजगी रुग्णालयात 3 नोव्हेबर रोजी ते हरले आणी त्यांचा कोरोणाशी झुंज देत असताना त्यांचे निधन झाले. आज ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वा. त्यांच्या बीड येथील निवासस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांसोबत जिल्ह्यातील आंबेडकरी विचाराच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. मानवंदना दरम्यान दलातील २५ स्कॉड सैनिकही गहिवरले. संजय कांबळे अमर घोषणेने संपूर्ण परिसर गहिवरून गेला होता.
कर्तव्यदक्ष, मनमिळाऊ, सामाजिक भान, निस्वार्थ स्वभावाचे अधिकारी म्हणून संजय कांबळे यांची राज्यभर ख्याती होती. तुरुंग अधीक्षक पदावर काम करत असताना अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपी त्यांच्या अधिपत्याखाली तुरुंगामध्ये ठेवले होते. कुख्यात दहशतवादीअतिरेकी अजमल कसाब याला मुंबईच्या तिहार जेलमध्ये ठेवल्यानंतर त्याची सर्व जबाबदारी संजय कांबळे यांनी पार पाडली होती. संजय कांबळे हे कवी, लेखक मनाचे असल्यामुळे त्यांचे वाचन आणि विचार मंथन यावर प्रभुत्व होते. यामुळेच त्यांच्या प्रत्येक कृती मधून सामाजिक दायित्व सिद्ध होत होते. यामुळे ते बीड जिल्ह्यासह राज्यभर लोकप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला असून आज गुरुवार दि. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वा. समता सैनिक दलाकडून त्यांच्या प्रतिमेस मानवंदना देण्यात आली. कर्तव्यावर असताना कोरोनासी झुंज देत असताना शहीद झालेल्या संजय कांबळे यांना पुष्पचक्र अर्पण करून आणि संजय कांबळे अमर रहे घोषणा देत मानवंदना करताना समता सैनिक दलाचे तथा भारतीय बौद्धचे महासभ व समता सैनिक दल बीड पदाधिकारी उपस्थित होता.
बीड
प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत
________