राष्ट्रीय महामार्गावर दुभाजक कशासाठी??अपघाताला जबाबदार कोण?? हाॅटेल व्यावसायिक, रस्ते बांधकाम विभाग कि बेजबाबदार नागरीक?? :- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
बीड तालुक्यातील मांजरसुंभा येथिल राष्ट्रीय महामार्गावर हाॅटेल कन्हैय्या समोर राष्ट्रीय महामार्ग धुळे-सोलापुर क्रमांक 52 वरील दुभाजक तोडुन त्याठिकाणी मातीचा रॅम्प तयार केलेला दिसला.
राष्ट्रीय महामार्गावर दुभाजक कशासाठी??
अपघाताला जबाबदार कोण??
हाॅटेल व्यावसायिक, रस्ते बांधकाम विभाग कि बेजबाबदार नागरीक??
:- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
बीड तालुक्यातील मांजरसुंभा येथिल राष्ट्रीय महामार्गावर हाॅटेल कन्हैय्या समोर राष्ट्रीय महामार्ग धुळे-सोलापुर क्रमांक 52 वरील दुभाजक तोडुन त्याठिकाणी मातीचा रॅम्प तयार केलेला दिसला.याठिकाणी वाहने बेकायदेशीर रित्या इकडून तिकडे जात वाहतुक नियमांची पायमल्ली करताना दिसली.यावेळी हाटेल व्यावसायिक यांना विचारल्यानंतर केवळ आजच्या लग्नामुळे केलेले आहे,आज संध्याकाळी काढून टाकतो ऊद्या सकाळी तुम्हाला दिसणार नाही.
सविस्तर माहितीसाठी :-
राष्ट्रीय महामार्ग धुळे-सोलापुर कन्हैय्या बीड रोड हाॅटेल समोर लग्नाची घाई गडबड..राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजक तोडलेले,मातीचा कृत्रिम रॅम्प तयार केलेला, वाहने अर्ध्यामधुनच ईकडून तिकडे जाताहेत,जर दुभाजकच तोडायचा असेल तर बांधलाय कशासाठी???
दुर्दैवाने भरधाव वेगात धावणा-या वेगाने अपघात जर झाला तर याला जबाबदार कोण??
यापूर्वीच बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय मा. नितिनजी गडकरी यांना लेखी तक्रार केल्यानंतर काही काळापुरता हा रॅम्प हटवण्यात आला होता.परंतु आज पुन्हा त्याठिकाणी रॅम्प केलेला आढळून आला....आता पुन्हा एकदा लेखी तक्रार करावी लागणार...आपण बेजबाबदार नागरीक कुणाचा तरी घात करणार डाॅ.गणेश ढवळे
जरी हाॅटेल व्यावसायिक यांनी दुभाजक तोडुन रस्ता तयार केला असेल, राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग आधिकारी, कर्मचारी यांनी दुर्लक्ष केले असले तरी जबाबदार नागरीकांनी वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत, दुर्घटना टाळल्या पाहिजेत, दुस-यांवर जबाबदारी टाकणे टाळले पाहिजेत. अन्यथा केवळ आधिकाराची अपेक्षा करायची आणि कर्तव्याचे पालन करायचे नाही हे चालणार नाही.
बीड
प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत
___________