"अ " प्रभागक्षेत्रातील मुख्य रस्त्यावरील फुटपाथने घेतला मोकळा श्वास... 

कल्याण डोंबिवली मनपाक्षेत्रातील मुख्य रस्त्यावरील फुटपाथवरील अतिक्रमणे हटवुन नागरिकांच्या येण्या जाण्यासाठी फुटपाथ मोकळे करणे बाबत मनपा आयुक्त अँक्शन मोड घेतल्याने रविवारी शहाड, आंबिवली, मोहने आंबिवली, टिटवाळा स्टेशन रोड परिसरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणावर "अ" प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांच्या पथकाने कारवाईचा बडगा उचलित अतिक्रमणे हटविल्याने फुटपाथने मोकळा श्वास घेतल्याचे दिसत होते.

"अ " प्रभागक्षेत्रातील मुख्य रस्त्यावरील फुटपाथने घेतला मोकळा श्वास... 
The sidewalk on the main road in the

कल्याण : कल्याण डोंबिवली मनपाक्षेत्रातील मुख्य रस्त्यावरील फुटपाथवरील अतिक्रमणे हटवुन नागरिकांच्या येण्या जाण्यासाठी फुटपाथ मोकळे करणे बाबत मनपा आयुक्त अँक्शन मोड घेतल्याने रविवारी शहाड, आंबिवली, मोहने आंबिवली, टिटवाळा स्टेशन रोड परिसरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणावर "अ" प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांच्या पथकाने कारवाईचा बडगा उचलित अतिक्रमणे हटविल्याने फुटपाथने मोकळा श्वास घेतल्याचे दिसत होते.

    कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिसरातील सर्व मुख्य रस्त्यावरील, पदपथावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी मनुष्यबळ व पोलिस दलासमवेत १ नोव्हेंबर ते  १५ नोव्हेंबर या पंधरवड्यात  विशेष मोहिम राबवून धडक कारवाई  सुरू केली आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील दुकानदार, किरकोळ विक्री करणारे विक्रेते, टपरी धारक व इतर व्यावसायिक यांनी, त्यांच्याकडून महापालिका परिसरातील पदपथांवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. अन्यथा होणा-या कारवाई सामोरे जावे, असे निर्देश पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार "अ" प्रभाग क्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांच्या पथकाने कारवाई चा बडगा उचलित अ प्रभागातील शहाड, अंबिवली, मोहने बल्याणी, टिटवाळा स्टेशन रोड परिसरातील मुख्य रस्त्यावरील फुटपाथ वरील अतिक्रमणावर कारवाई केली. यामध्ये  १५ टपर्या,  १४ हातगाड्या,  १७ शेड, ६ बाकडे  जेसीबीच्या सहाय्याने तसेच  हातोडा चालवित निष्कसित केले. यामुळे फुटपाथवर अतिक्रमण करीत धंदा करणाऱ्या फेरीवाले, हातगाडीवाले, ठेलेवाले यांचे धाबे दणाणले असुन मुख्य रस्त्यावरील फुटपाथने मोकळा श्वास टाकल्याचे चित्र या निमित्ताने दिसत आहे.

कल्याण, ठाणे

 प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे 

___________