दलित बहुजनावरती अन्याय अत्याचार खपून घेणार नाही अन्यथा पँथर स्टाईलने रिपाई आंदोलन करणार... - दयाल बहादुरे | रिपाई शिष्टमंडळाने घेतली पोलिस उपायुक्तांची भेट...

ठाणे येथील दिवा या ठिकाणी अनुसूचित जातीच्या एका ४ वर्षाच्या चिमुरडीवर एका नराधमाने  अत्याचार केला. यामुळे ठाणे, मुंबई, महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशांमध्ये या प्रकरणांमध्ये बदनामी झाली आहे व आजही या देशातील बालिका,तरुण, महिला, व स्त्रिया सुरक्षित नाही अशी भावना निर्माण झाली आहे.

दलित बहुजनावरती अन्याय अत्याचार खपून घेणार नाही अन्यथा पँथर स्टाईलने रिपाई आंदोलन करणार... - दयाल बहादुरे | रिपाई शिष्टमंडळाने घेतली पोलिस उपायुक्तांची भेट...
Injustice against Dalit Bahujana will not be tolerated, otherwise Ripai agitation will be carried out in Panther style ... - Dayal Bahadur | Ripai delegation meets Deputy Commissioner of Police ...

दलित बहुजनावरती अन्याय अत्याचार खपून घेणार नाही अन्यथा पँथर स्टाईलने रिपाई आंदोलन करणार... - दयाल बहादुरे

रिपाई शिष्टमंडळाने घेतली पोलिस उपायुक्तांची भेट...

ठाणे येथील दिवा या ठिकाणी अनुसूचित जातीच्या एका ४ वर्षाच्या चिमुरडीवर एका नराधमाने  अत्याचार केला. यामुळे ठाणे, मुंबई, महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशांमध्ये या प्रकरणांमध्ये बदनामी झाली आहे व आजही या देशातील बालिका,तरुण, महिला, व स्त्रिया सुरक्षित नाही अशी भावना निर्माण झाली आहे.यासंदर्भात मुंब्रा पोलीस ठाणे येथे अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये पॉस्को कायद्यानुसार 376 व 354 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे तसेच नराधमास अटक करण्यात आली आहे.. परंतु या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये वारंवार अशा घटना घडतात परंतु याला कुठलाच प्रतिबंध होत नाही  याला काहीच बंधन नाही . महाविकास आघाडी सरकारने दिशा कायदा आणला आहे.

परंतु त्याची अंमलबजावणी व्हावी दिनांक 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शिष्टमंडळाने कळवा येथे पोलीस उपायुक्त घोसाळकर यांची भेट घेऊनवारंवार होणाऱ्या या घटना रोखण्यासाठी व कायमस्वरूपी प्रतिबंध करण्यासाठी चर्चा केली यावेळी शिष्टमंडळात मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय सचिव दयाल बहादुरे, महाराष्ट्र सेक्रेटरी व पत्रकार संजय बोर्डे महाराष्ट्र सह सचिव बाळकृष्ण गायकवाड महिला नेत्या त्रीशीला बहादुरे यांनी भेट घेऊन आंदोलनाचा इशारा दिला. तसेच पीडितेच्या कुटुंबीयांना संरक्षण देऊन दिवा शहरासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन द्यावे अशी मागणी केली. यासंदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच लवकरच गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन यासंदर्भात योग्य तो निर्णय घेण्याची मागणी करण्यात येणार आहे.

मुंबई

प्रतिनिधि - संजय बोर्डे

___________