रिपाइं आठवले युवक पक्षाचे तालुका अध्यक्ष अण्णा साळवे भाजपात...

येत्या मुरबाड नगर पंचायत व तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या निवडनुकां मध्ये भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व कायम अबाधीत राहण्या साठी भाजपने कंबर कसली असून रिपाई मधील रस्त्यावरची लढाई लढणारे झुंजार नेतृत्व असणारे आण्णा साळवे यांना भाजप मध्ये प्रवेश देऊन आंबेडकरी मतदार आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला आहे.

रिपाइं आठवले युवक पक्षाचे तालुका अध्यक्ष अण्णा साळवे भाजपात...
Ripai Athavale Yuvak Paksha taluka president Anna Salve in BJP ...
रिपाइं आठवले युवक पक्षाचे तालुका अध्यक्ष अण्णा साळवे भाजपात...
रिपाइं आठवले युवक पक्षाचे तालुका अध्यक्ष अण्णा साळवे भाजपात...
रिपाइं आठवले युवक पक्षाचे तालुका अध्यक्ष अण्णा साळवे भाजपात...
रिपाइं आठवले युवक पक्षाचे तालुका अध्यक्ष अण्णा साळवे भाजपात...

रिपाइं आठवले युवक पक्षाचे तालुका अध्यक्ष अण्णा साळवे भाजपात...

येत्या मुरबाड नगर पंचायत व तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या निवडनुकां मध्ये भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व कायम अबाधीत राहण्या साठी भाजपने कंबर कसली असून रिपाई मधील रस्त्यावरची लढाई लढणारे झुंजार नेतृत्व असणारे आण्णा साळवे यांना भाजप मध्ये प्रवेश देऊन आंबेडकरी मतदार आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला आहे.

भाजप किसान मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीण आयोजित कार्यकारणी घोषणा पदनियुक्ती प्रदान सोहळा बुधवार दिनांक २५ नोव्हेंबर रोजी मांडा टिटवाळा येथे मोठ्या दिमाखात पार पडला या कार्यक्रमात मुरबाड तालुका रिपाईचे  युवक अध्यक्ष अण्णा साळवे यांचा जाहिर भाजप पक्ष प्रवेश मोठ्या उत्साहात भिवंडी लोकसभेचे खासदार कपील पाटील, मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे,माजी मंत्री जगन्नाथ पाटील , किसान मोर्चाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष जयराम भोईर यांच्या हस्ते अण्णा साळवे यांचा पदनियुक्ती सोहळा पार पडला. 

या प्रसंगी खासदार कपील पाटील ,आमदार किसन कथोरे यांनी अण्णा साळवे यांच्या मुरबाड तालुक्यातील कार्याचा गौरव करीत असे तळागाळात काम करणारे हाडामांसाचे कार्यकर्ते,आंबेडकरी चळवळीत खरे काम करीत आहेत. ते  भाजप मध्ये आल्याने पक्षाची ताकद नक्कीच वाढली आहे.त्यांच्या कार्याचा पक्षाला मोठा फायदा होणार आहे. या प्रसंगी अण्णा साळवे यांना अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष हे महत्वाचे पदाची माळ माजी मंत्री जगन्नाथ पाटील आमदार किसन कथोरे, खासदार कपील पाटील यांच्या हस्ते आज टाकण्यात आली.

अण्णा साळवे यांच्या रिपाई मधून थेट भाजप प्रवेशाने रिपाईला मोठा धक्का बसला असून रिपाई मधील अंतर्गत वादाचा मोठा फटका बसला असल्याचे बोलले जातेय येत्या नगर पंचायत,ग्राम पंचायत निवडनुकी मध्ये साळवे यांच्या पक्ष प्रवेशा मुळे मोठे बळ भाजपला मिळाल्याचे बोलले जाते.

मुरबाड

प्रतिनिधी - लक्ष्मण पवार 

___________