माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी अशोक मासाळ...
केंद्रीय निवडणूक आयोग मान्यताप्राप्त माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती च्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी श्री अशोक आण्णाप्पा मासाळ यांची निवड झाल्याबद्दल संपूर्ण सांगली जिल्ह्यामधून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सोशालिस्ट पार्टीच्या संलग्न असलेल्या माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत आपटे यांच्या आदेशाने दीपक दिलीप कांबळे यांनी जिल्हाध्यक्षपदाची पत्र देऊन त्यांच्यावर माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीची धुरा सोपवली आहे.
त्यामुळे गुंडेवडी गावाच्या शिर पेचात आणखी एक मानाचा तुरा शैक्षणिक क्षेत्राबरोबर पत्रकारिता मध्ये तसेच सामाजिक व राजकीय विचार मांडणारे श्री अशोक मासाळ सर यांच्या रूपाने सांगली जिल्ह्याला मिळाला आहे. त्यांच्या अथक परिश्रमाची, उच्च वैचारिक भूमिकेची आणि गतिमान चौफेर यशस्वी कार्याची विशेष दखल घेऊन आपणास केंद्रीय निवडणूक आयोग मान्यताप्राप्त माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी निवड केली आहे असे कांबळे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार सांगितले आहे.
प्रतिकूल परिस्थितीशी लढा देत आत्मविश्वासाने आपण आपल्या क्षेत्रात आजवर चौफेर घौडदौड सुरू ठेवले आहे. आपले कार्य निश्चितच गौरवास्पद आहे. असेच आदर्श समाज निर्मिती आणि जनहितार्थ आपणाकडून विधायक क्षेत्रात कार्य घडत राहील असा आमचा ठाम विश्वास आहे भविष्यातील आपल्या वैभवशाली कार्यास नॅशनल सोशलिस्ट पार्टीच्या वतीने व लहुजी क्रांति मोर्चा सांगली जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथ सकट यांच्ये वतिने लाख लाख शुभेच्छा ही देण्यात आले आहेत.
सांगली
प्रतिनिधी - जगन्नाथ सकट
_________