रिक्षा चालकाच्या प्रमाणिकपणामुळे महिलेला दागिने परत, रिक्षा चालकाचा पोलिसांकडून सन्मान

 पालघर शहरात प्रवास करत असताना पैसे व दागिन्यांची पिशवी रिक्षात विसरली अस्ता.... रिक्षा चालकाच्या प्रमाणिकपणामुळे महिलेला दागिने परत मिळाले.

रिक्षा चालकाच्या प्रमाणिकपणामुळे महिलेला दागिने परत, रिक्षा चालकाचा पोलिसांकडून सन्मान
Rickshaw driver's honesty returns jewelry to woman, rickshaw driver honored by police

रिक्षा चालकाच्या प्रमाणिकपणामुळे महिलेला दागिने परत, रिक्षा चालकाचा पोलिसांकडून सन्मान

       पालघर शहरात राहणारी एक महिला रिक्षाने प्रवास करत असताना ती आपले पैसे व दागिन्यांची पिशवी रिक्षातच विसरली. ही बाब टेंभोडे येथील रिक्षा चालक भगवान माळी यांच्या काही वेळाने लक्षात आली असता रिक्षा चालकाने आपल्या प्राणिकपणाने ते पैसे व दागिन्यांची पिशवी पालघर पोलीस स्टेशनमध्ये लगेचच जमा केली. त्याच्या या प्रामाणिकपणामुळे पालघर पोलिसांनी रिक्षा चालक भगवान माळी याचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

       पालघर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांच्या पत्नी पालघर शहरातील एका दागिन्यांच्या दुकानातून आपले मंगळसूत्र दुरुस्तीसाठी गेल्या असता आपल्या मुलीसह रिक्षातून घराकडे निघाल्या होत्या. यादरम्यान पैसे व मंगळसूत्र असलेली पिशवी त्या रिक्षातच विसरल्या. मात्र त्यानंतर ही बाब लक्षात येताच रिक्षाचालक भगवान माळी यांनी मंगळसूत्र व पैसे असलेली ही पिशवी प्रामाणिकपणाने पालघर पोलीसांकडे सुपूर्द केली. भगवान माळी यांच्या प्रामाणिकपणामुळे कहाळे यांना त्यांचे पैसे व मंगळसूत्र परत मिळाले. पालघर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी रिक्षाचालक माळी यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला आहे. माळी यांच्याकडून प्रेरणा घेऊन सर्व रिक्षाचालकांनी अशीच प्रामाणिकता दाखवावी असे आवाहनही यावेळी पाटील यांनी केले.

पालघर

प्रतिनिधी - राजेंद्र पाटील

____