सांगली जिल्हातील कवठे महांकाऴ तालुक्याती  कुची गावचे ज्यांनी सरपंच म्हणून 27 वर्ष अतिशय निस्वार्थपणे काम केले ते आदरणीय ज्ञानदेव चंद्रोजी पाटील(भाऊ) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन...

सांगली जिल्हा प्रतिनिधि जगन्नाथ सकट (1962 ते 1995) या काळात कुची गावच्या राजकरणातील एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे भाऊ.भाऊ या नावाने ते लहान थोरा मध्ये गावापासुन   तालुक्या पर्यंत परिचित होते.

सांगली जिल्हातील कवठे महांकाऴ तालुक्याती  कुची गावचे ज्यांनी सरपंच म्हणून 27 वर्ष अतिशय निस्वार्थपणे काम केले ते आदरणीय ज्ञानदेव चंद्रोजी पाटील(भाऊ) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन...
Revered Dnyandev Chandroji Patil (brother) of Kavathe Mahanka in Kuli village of Sangli district who worked very selflessly as Sarpanch for 27 years passed away tragically due to old age ...

सांगली जिल्हातील कवठे महांकाऴ तालुक्याती  कुची गावचे ज्यांनी सरपंच म्हणून 27 वर्ष अतिशय निस्वार्थपणे काम केले ते आदरणीय ज्ञानदेव चंद्रोजी पाटील(भाऊ) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन...

सांगली जिल्हा प्रतिनिधि जगन्नाथ सकट (1962 ते 1995) या काळात कुची गावच्या राजकरणातील एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे भाऊ.भाऊ या नावाने ते लहान थोरा मध्ये गावापासुन   तालुक्या पर्यंत परिचित होते.त्यांचे मूळ नाव ज्ञानदेव चंद्रोजी पाटील .त्यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1922 रोजीचा. इयत्ता सातवी पास असणाऱ्या भाऊंना मोडी भाषा अवगत होती.

त्यांचे बालपण वारकरी संप्रदायात वाढल्यामुळे वयाच्या विसाव्या वर्षापासून एकादशी आणि महिन्याची पंढरीची वारी ते नियमितपणे करत. धोतर ,तीन बटनांचा शर्ट , टोपी,कपाळावर गोपीचंदनाचा टिळा असा त्यांचा पेहराव होता. सकाळी उठल्यावर देवपूजा आटोपून ञानेश्‍वरीचे वाचन करत.

मंदिरातील देवतांना वंदन करून इतर कामे करत.काळानुरूप भाऊंची पावलं नकळत राजकारणाकडे वळली आणि पस्तीस वर्षे सक्रिय राहिली. त्यातील 27 वर्षे त्यांनी गावचे सरपंच होण्याचा मान मिळवला. त्यांच्या कारकिर्दीत सर्वसामान्य, गोरगरिबांची ,अनेक लोकोपयोगी कामे केली.स्वच्छ पाणी पुरवठा ,अंगणवाड्या, आरोग्य केंद्र यासारख्या सुविधांना प्राधान्य दिले. शिक्षणाने माणूस घडतो.

गल्लीबोळातून येता-जाता मुलांना शिक्षक दिसले की मुलं सुसंस्कारित होण्यास मदत होते अशी त्यांची धारणा होती. यासाठी शिक्षकांनी गावात राहावे म्हणून ते आग्रह करत. माणसा इतके त्यांनी प्राण्यावर ही  प्रेम केले .त्यांनी पाळलेला कुत्रा रक्षका प्रमाणे सतत त्यांच्या अवतीभवती असायचा.

भाऊ प्रवासाला निघाले की कित्येकदा तो त्यांच्याबरोबर एसटीत चढायचा.  भाऊंना एसटीतून खाली उतरायला भाग पाडायचा. कुच्ची येथील विकास सोसायटीच्या चेअरमन पदही त्याना मिळाले. त्यावेली शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालनास त्यांनी महत्त्व दिलं.

जर्सी गाईंच्या खरेदीला प्राधान्य दिल्यामुळे गावातून विक्रमी दूध संकलन होऊ लागले. कवठे महांकाळ तालुक्याचे नेते माजी मंत्री अजितराव घोरपडे (सरकार) यांच्या उज्वल कारकिर्दीतील शिलेदारांपैकी एक म्हणजे भाऊ .त्यामुळे त्यांना तालुका दूध संघाचे संचालक पदीही मिळाले .1995 च्या दरम्यान वयाच्या सत्तरीत मध्ये स्वतःहून त्यांनी  राजकीय कारकीर्द  तरुणाईकडे सोपवली. कारण बदलत्या काळानुसार माणसांची मनं आणि विचारसुद्धा बदलतात याची त्यांना जाणीव होती. तरुणाईला मार्गदर्शकाची भूमिका निभावताना त्यांनी कोणाच्याही कार्यात अडथळा निर्माण केला नाही.

गेल्या दोन-तीन वर्षापासून त्यांची प्रकृती खालावत होती परंतु अंथरुणावर मात्र कधी पडले  नाहीत. आपला पोती वाचण्याचा उपक्रम अखेरपर्यंत टिकवला. त्यांना दृष्टीनेही उत्तम साथ दिली.अखेर मार्गशीर्ष शुक्ल दशमीला त्यांचं अल्पशा आजाराने देहावसान झाले. कुटुंबीयांनी रंगवलेली अनेक स्वप्ने बाजूला सारून भाऊ अनंतात विलीन झाले.

सांगली जिल्हा

प्रतिनिधि - जगन्नाथ सकट

___________