लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालय व ज्युनिअर काँलेजच्या पाच कर्मचाऱ्याचा सेवापुर्ती सोहळा संपन्न...

आगरवाडी येथील लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालय व ज्युनिअर काँलेजचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिपाई यांचा निरोप समारंभ शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालय व ज्युनिअर काँलेजच्या पाच कर्मचाऱ्याचा सेवापुर्ती सोहळा संपन्न...
Retirement ceremony of five employees of Lok Nayak Jayaprakash Narayan Vidyalaya and Junior College ...
लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालय व ज्युनिअर काँलेजच्या पाच कर्मचाऱ्याचा सेवापुर्ती सोहळा संपन्न...

लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालय व ज्युनिअर काँलेजच्या पाच कर्मचाऱ्याचा सेवापुर्ती सोहळा संपन्न...

आगरवाडी येथील लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालय व ज्युनिअर काँलेजचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिपाई यांचा निरोप समारंभ शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. शाळेचे मुख्याध्यापक महेश राऊत, उपमुख्याध्यापिका गिता पागी, पर्यवेक्षक प्रभाकर पाटील, गणेश घरत, सह. शिक्षक पाडुरंग पाटील व शिपाई सूर्यकांत मोहिते यांच्या सेवापुर्ती सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून पालघर ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष, पतपेढी विद्यमान अध्यक्ष तथा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारार्थी संतोष पावडे हे उपस्थित होते. 

या सेवापुर्ती सोहळ्यात उपस्थिताना मार्गदर्शन करताना पावडे म्हणाले शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातील ज्ञानदानाचे पवित्र कार्य करुन आपण सेवानिवृत्त होत आहात. आपल्या सेवाकाळात या देशाचे भावी नागरिक घडविण्यात आपले उल्लेखनीय योगदान आहे. विविध क्षेत्रात कार्य करणारे विद्यार्थी हीच खरी शिक्षकांची संपत्ती आहे. शिक्षक हे परमेश्वराचे दूत आहेत, यांचे भान ठेवून आपण काम केले आणि आपले विद्यार्थी खेळातून राष्ट्रीय व राज्य स्तरावर निवडले गेले, सैनिक सेवेत गेले तसेच अनेक क्षेत्रांत कार्य करतात हीच आपली संपत्ती आपले यश मानुन नोकरीकडे उपजिविका न पाहता जिविका म्हणून पाहावे, एखादया कलेचा आधार घेवुन पुढील आयुष्यात कार्यरत रहावे. जीवनात येणाऱ्या प्रत्येक घटनेकडे सकारात्मक दृष्टीकोनातुन पाहून आनंद मय जिवन जगावे.

शाळा व समाजाचे उतरदायित्व मानुन उर्वरीत आयुष्य समाजातील आपल्या समाज बाधवाचे जिवन आनंदी करण्यासाठी कार्य करावे. याप्रसंगी आदिवासी एकता परिषद अध्यक्ष काळुराम धोदडे, उपमुख्याध्यापक राजन घरत, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांचे नातेवाईक यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. सेवानिवृत्त मुख्याध्यापक महेश राऊत यांच्या दीड वर्षे कालावधीतील उल्लेखनीय कार्याबद्दल अनेकांनी गौरवोद्गार काढले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे कार्याध्यक्ष चितामण ठाकूर होते. त्यांनी सर्वांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष पि.टी.पाटील, पतपेढी संचालक रवींद्र ठाकुर, संस्थेचे माजी कार्याध्यक्ष राजाराम म्हात्रे माजी मुख्याध्यापक संजिव म्हात्रे, मनिषा ठाकुर, संस्था पदाधिकारी, शिक्षक आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

पालघर

प्रतिनिधी - राजेंद्र पाटील

___________