रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) राष्ट्रीय सचिव दयाल बहादुरे व त्यांच्या परिवारास जातीवाचक शिवीगाळ जीव मारण्याची धमकी !! | त्रिषला बहादूरे यांचा विनयभंग कडक पाडा पोलिसांनी केला गुन्हा दाखल...

कल्याण, (प) येथे काही दिवसापासुनरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय सचिव परिवार राहत आहे. त्यांच्याच सोसायटीमध्ये राहत असलेला गुंड जातियवादी - सिध्देश अण्णा बानखेले, त्याचे वडील अण्णा बानखेले यांनी नेहमीच सौ त्रिशिला दयाल बहादूरे यांना जातीय आकसातून त्रास दिलेला आहे. दिनांक 22 डिसेंबर रोजी त्यांनी त्रिशला बहादूरे व तन्मय बहादुरे यांना शिवीगाळ करून घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिली दयाल बहादूरे यांच्या कुटूंबाला नाहक त्रास देणारा  सिद्धेश आण्णा बानखेले गुन्हेगारी विकृती चा असून व त्याचे आई वडील नाहक बहादूरे परिवारांस त्रास देत आहेत.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) राष्ट्रीय सचिव दयाल बहादुरे व त्यांच्या परिवारास जातीवाचक शिवीगाळ जीव मारण्याची धमकी !! |  त्रिषला बहादूरे यांचा विनयभंग कडक पाडा पोलिसांनी केला गुन्हा दाखल...
Republican Party of India (Athavale) National Secretary Dayal Bahadur and his family threatened to kill with racist insults !! | Trishla Bahadure molested by Kadak Pada police filed a case ...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) राष्ट्रीय सचिव दयाल बहादुरे व त्यांच्या परिवारास जातीवाचक शिवीगाळ जीव मारण्याची धमकी !!

त्रिषला बहादूरे यांचा विनयभंग कडक पाडा पोलिसांनी केला गुन्हा दाखल...

जास्मीन सहकारी, सोसायटी खडकपाडा - कल्याण, (प) येथे काही दिवसापासुनरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय सचिव परिवार राहत आहे. त्यांच्याच सोसायटीमध्ये राहत असलेला गुंड जातियवादी - सिध्देश अण्णा बानखेले, त्याचे वडील अण्णा बानखेले यांनी नेहमीच सौ त्रिशिला दयाल बहादूरे यांना जातीय आकसातून त्रास दिलेला आहे. दिनांक 22 डिसेंबर रोजी त्यांनी त्रिशला बहादूरे व तन्मय बहादुरे यांना शिवीगाळ करून घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिली दयाल बहादूरे यांच्या कुटूंबाला नाहक त्रास देणारा  सिद्धेश आण्णा बानखेले गुन्हेगारी विकृती चा असून व त्याचे आई वडील नाहक बहादूरे परिवारांस त्रास देत आहेत.

म्हणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) व विविध सामाजिक संघटना यांच्या वतीने खडकपाडा पोलीस स्टेशन कल्याण (प.) येथे करण्यात आली आहे.
याप्रसंगी सदर कार्यकर्ते उपस्थित होते.

आण्णा साहेब रोकडे जेष्ठ नेते , घनश्याम चिरणकर साहेब , सहाय्यक सचिव (आठवले साहेब) , बाळकृष्ण गायकवाड (मामा) रिपाई , महा प्रदेश सह सचिव , महेंद्र (भाऊ) गायकवाड माजी नगरसेवक रिपाई , महादेव रायभोळे साहेब माजी नगरसेवक , मीनाताई साळवे रिपाई जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी , बाळ भालेराव रिपाई ग्रामीण जिल्हा सरचिटणीस , हरिष कांबळे , संग्राम मोरे रिपाई युवा जिल्हा अध्यक्ष , अभिनेते सुनील जगताप साहेब , दिनेश जाधव रिपाई युवा अध्यक्ष मोहने , संतोष जाधव रिपाई कल्याण शहर अध्यक्ष , मा.दिपकभाऊ वानखडे समाजसेवक संस्थापक अध्यक्ष बहुजन , समाज परिवर्तन प्रतिष्ठान महाराष्ट्रा राज्य.

प्रतीक सानप विद्यार्थी आघाडी जिल्हा अध्यक्ष रिपाई , जालिंदर बर्वे वार्ड अध्यक्ष ०७ रिपाई , ऍड संजय शंभरकर , सामाजिक कार्यकर्ते अर्चना कदम , सारिका राक्षे , सागर शेजवळ , विकास खैरणार , अजय गायकवाड (उत्तर मध्य मुंबई जिल्हा सचिव रिपाई) , रोशन जाधव रिपाई युवा उपाध्यक्ष ०७ , अनिल साळवे वशिंद रिपाई विभागीय कार्यध्यक्ष , किसन कोळेकर
अशोक खैरे व इतर शेकडो कार्यकर्ते यांनी खडकपाडा पोलीस स्टेशन मध्ये गुंड विकृत जातीवादी सिद्धेश आण्णा बाणखेले या गुंडा वरती  गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.परंतु ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला असून सुद्धा परिवारा वरती व सहा कार्यकर्ते वरती क्रॉस कम्प्लीट केली आहे.

याची कसून चौकशी झाली पाहिजे,खडकपाडा पोलीस गुन्हेगार ला वाचवण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना? याची गंभीर दखल केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी घेतली आहे व परिवारास न्याय मिळाला नाही तर एक उग्र आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यासंदर्भात ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेऊन त्यांना कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहेे.

मुंबई

प्रतिनिधी - संजय बोर्डे

___________