दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सर्व धार्मिक स्थळं उघडणार – मुख्यमंत्री

अनलॉकची प्रक्रिया सुरू असली तरी राज्यातील मंदिरं मात्र उघडण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. अनलॉकमध्ये बहुतेक सर्वच बाबी सुरु झाल्याने राज्यातील मंदिरंही खुली करावीत अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. अखेर दिवाळी पाडव्यापासून म्हणजेच १६ नोव्हेंबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची मंदिरे आणि प्रार्थनस्थळे उघडण्यात येणार आहे.

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सर्व धार्मिक स्थळं उघडणार – मुख्यमंत्री
All religious places will be opened on the occasion of Diwali Padva - CM

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सर्व धार्मिक स्थळं उघडणार – मुख्यमंत्री

पिंपरी : अनलॉकची प्रक्रिया सुरू असली तरी राज्यातील मंदिरं मात्र उघडण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. अनलॉकमध्ये बहुतेक सर्वच बाबी सुरु झाल्याने राज्यातील मंदिरंही खुली करावीत अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. अखेर दिवाळी पाडव्यापासून म्हणजेच १६ नोव्हेंबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची मंदिरे आणि प्रार्थनस्थळे उघडण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत माहिती दिली. मात्र भाविकांना यावेळी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.

“ दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मियांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळलीच.”, असे मुख्यमंत्री म्हणाले.

'श्रीं ची इच्छा समजा!'

देव आपल्यातच होते, पण आता उद्याच्या पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा व स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा. हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रीं ची इच्छा समजा! मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका. मंदिरे उघडतील, इतर प्रार्थनास्थळे उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील!

पिंपरी

प्रतिनिधी - आत्माराम काळे

__________