अखिल भारतीय सेनेच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदी राजेश दाखीनकर यांची पुनर्नियुक्ती...

अखिल भारतीय सेनेच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदी राजेश दाखीनकर यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र अखिल भारतीय सेना राष्ट्रीय सरचिटणीस आशा गवळी यांच्याहस्ते देण्यात आले.

अखिल भारतीय सेनेच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदी राजेश दाखीनकर यांची पुनर्नियुक्ती...
Re-appointment of Rajesh Dakhinkar as Thane District President of Akhil Bharatiya Sena ...

अखिल भारतीय सेनेच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदी राजेश दाखीनकर यांची पुनर्नियुक्ती...

कल्याण : अखिल भारतीय सेनेच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदी राजेश दाखीनकर यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र अखिल भारतीय सेना राष्ट्रीय सरचिटणीस आशा गवळी यांच्याहस्ते देण्यात आले.  

येत्या काही महिन्यांत कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका असून या निवडणुकांच्या दृष्टीने दाखीनकर यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. या अनुषंगाने अखिल भारतीय सेना पक्षप्रमुख  माजी आमदार अरुण गवळी यांच्या आदेशाने महाराष्ट्र संपर्कप्रमुख राजेश कदम यांच्या नेतृत्वात  दाखीनकर यांची अखिल भारतीय सेना ठाणे जिल्हाअध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

याआधीदेखील दाखीनकर यांनी पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण ठाणे जिल्ह्यात नागरिकांचे अनेक प्रश्न, तसेच समस्या सोडविल्या असून अनेक नैसर्गिक आपत्तीमध्ये महराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेरील नागरिकांना मदत केली आहे. त्याचप्रमाणे पक्षसंघटना वाढीसाठी देखील महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

यामुळे त्यांची ठाणे जिल्हाध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे.  पक्षाने आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करुन पक्षबांधणी पाया मजबूत करून आगामी कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर निवडणुकीत पक्षाचे उमेदवार देऊन पक्षाचे नगरसेवक निवडून आणणार असल्याने दाखीनकर यांनी यावेळी सांगितले.

कल्याण, ठाणे

प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे 

___________