रांगोळी स्पर्धेत रोहिणी पराड तर किल्ले बांधणी स्पर्धेत प्रणित बांगर प्रथम...
आदिवासी युवा प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने दिपावली निम्मित आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत कु.रोहिणी पराड यांनी काढलेली बेटी बचाव रांगोळी प्रथम क्रमांक, तर किल्ले बांधणी स्पर्धेत कु.प्रणित बांगर यांनी तयार केलेला जंजिरा किल्ला प्रथम क्रमांक मिळविला.
रांगोळी स्पर्धेत रोहिणी पराड तर किल्ले बांधणी स्पर्धेत प्रणित बांगर प्रथम...
दि.१५ आदिवासी युवा प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने दिपावली निम्मित आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत कु.रोहिणी पराड यांनी काढलेली बेटी बचाव रांगोळी प्रथम क्रमांक, तर किल्ले बांधणी स्पर्धेत कु.प्रणित बांगर यांनी तयार केलेला जंजिरा किल्ला प्रथम क्रमांक मिळविला. रांगोळी मधून महिलांनी विविध सामाजिक विषयांवर भर देत रांगोळी साकार केल्या. तसेच जन्मतःच अपंग असणाऱ्या दोन मुलांना संस्थे मार्फत कपड्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पालघर जिल्हा परिषद सदस्या सौ. रोहिनीताई शेलार, वाडा पंचायत समिती सदस्या सौ. पुनमताई दिनेश पथवा, श्री.रोहिदासजी शेलार (स्विय सहाय्यक,आमदार दौलतजी दरोडा साहेब) उपस्थित होते.
स्पर्धेचे परीक्षण श्री.संजय माढे सर, श्री.शरद पराड सर, संस्थेचे अध्यक्ष विकास पराड आणि उपाध्यक्ष दिनेश वांगड यांनी केले.
स्पर्धेचा निकाल; रांगोळी स्पर्धा - प्रथम क्रमांक कु.रोहिणी पराड द्वितीय सौ.प्रणाली काठे तृतीय सौ.नयन खैर आणि कु.सानिका लाखात.
किल्ले स्पर्धा - प्रथम कु.प्रणित कोर द्वितीय पवन कोर तृतीय संचित लोटे यावेळी विजेत्याला सन्मानचिन्ह, सहभाग घेणाऱ्या स्पर्धकास प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान केला.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांचे आजच्या पिढीतील लहानग्यांना माहिती व्हावी, या गडकिल्ल्याचा इतिहास त्यामागील अपार मेहनत व अनेकांनी त्यासाठी सांडलेले रक्त या सर्वाविषयी आदर निर्माण व्हावा हा हेतू डोळ्यासमोर ठेवून स्पर्धा आयोजित केल्याचे संस्थेचे सरचिटणीस कल्पेश लोटे यांनी सांगितले.
कार्यक्रमास श्री.विष्णु पराड, श्री.राजेंद्र वळवी, श्री.शंकर पालवे, रुपेश पाटील, सुधीर भोईर, कांचन निपुर्ते, प्रमोद काठे, मनोज बुंधे, भालचंद्र काठे, क्रिश नडगे, सूरज वांगड, मनोज भोये, कुंदन लोटे, चंद्रकांत दुधवडा, प्रशांत काठे, आकाश पराड, नरेश भोये, सुरेश महाले, गणेश भोये, संजय करतोडा, भूषण पराड, विष्णू धिंडा, सदानंद करतोडा, सुरेश महाले इ. मान्यवर उपस्थित होते.
वाडा
प्रतिनिधी - जयेश घोडविंदे
__________