२०२३ मध्ये खाजगी रेल्वे गाडया धावणार ; वेळापत्रक तयार...

खासगी कंपन्यांना प्रवासी गाडय़ांची सेवा सुरू करण्याची औपचारिक सुरुवात झाली आहे.

२०२३ मध्ये खाजगी रेल्वे गाडया धावणार ; वेळापत्रक तयार...

२०२३ मध्ये खाजगी रेल्वे गाडया धावणार ; वेळापत्रक तयार...

नवी दिल्ली : रेल्वेने खासगी गाडय़ांचे वेळापत्रक तयार केले असून त्यानुसार पहिल्या ताफ्यातील १२ गाडय़ा २०२३ मध्ये धावणार आहेत. त्यानंतरच्या आर्थिक वर्षांत आणखी ४५ तर सर्व १५१ खासगी गाडय़ांची सेवा २०२७ मध्ये सुरू केली जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

खासगी कंपन्यांना प्रवासी गाडय़ांची सेवा सुरू करण्याची औपचारिक सुरुवात झाली असून रेल्वेने या महिन्याच्या पूर्वार्धात कंपन्यांकडून १०९ दुहेरी मार्गावर १५१ प्रवासी गाडय़ा चालविण्यासाठी प्रस्ताव मागविले होते. या प्रकल्पात खासगी क्षेत्रातील ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. खासगीकरणाच्या योजनेचा एक भाग म्हणून १२ गाडय़ांचा पहिला ताफा २०२२-२३ मध्ये, दुसरा ४५ गाडय़ांचा ताफा २०२३-२४ मध्ये, तिसरा ५० गाडय़ांचा ताफा २०२५-२६ मध्ये आणि त्यापुढील आर्थिक वर्षांत ४४ गाडय़ांचा ताफा असा एकूण १५१ गाडय़ांचा ताफा २०२६-२७ मध्ये सुरू केला जाणार आहे.