खोडाळा विभागात आद्यक्रांतीविर राघोजी भांगरे यांची जयंती साजरी...
या वर्षी करोना सारख्या महामारी मुळे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करता आले नाही तरी आद्यक्रांतीविर राघोजी भांगरे यांच्या जयंती निमित्त खोडाळा विभागात जयंती मात्र सोशल डिस्टिंगचं पालन करून साजरी करण्यात आली.
खोडाळा विभागात आद्यक्रांतीविर राघोजी भांगरे यांची जयंती साजरी...
खोडाळा : दि.०९ नोव्हेंबर २०२०, गोमघर,वाकडपाडा,ऊधळे,काष्टी येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.या वर्षी करोना सारख्या महामारी मुळे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करता आले नाही तरी आद्यक्रांतीविर राघोजी भांगरे यांच्या जयंती निमित्त खोडाळा विभागात जयंती मात्र सोशल डिस्टिंगचं पालन करून साजरी करण्यात आली.सदर कार्यक्रमाची सुरुवात गोमघर येथून झाली या ठिकाणी सकाळी १० वाजता कार्यक्रम सुरू झाला यावेळी भरत गारे गुरुजी,प्रदीप वाघ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली गोमघर येथे कार्यक्रम पार पडला यावेळी दिलीप जागले , पाडुरंग गवारी संतोष पाटील ,विष्णू हमरे उपस्थित होते.
यानंतर खोडाळा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौफुली येथे आद्यक्रांतीविर राघोजी भांगरे ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व आदिवासी अस्मितेचे प्रतिक असलेल्या फडकी ध्वजारोहण करून कार्यक्रमास सुरुवात केली.
यानंतरखोडाळा ग्रामपंचायत कार्यालयात आद्यक्रांतीविर राघोजी भांगरे यांच्या कार्यावर प्रबोधन करण्यात आले या वेळी सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामपंचायत उपसरपंच मा.मनोज कदम साहेब हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती प्रदीप वाघ साहेब यांनी मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साळवे साहेब यांनी केले यावेळी आद्यक्रांतीविर राघोजी भांगरे व डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारमंचाचे अध्यक्ष संजय इधे सर भरत गारे गुरुजी तसेच युवा नेते मिलिद झोले साहेब ,सचिन पाटील, संदीप पाटील, युवराज सालकर ,जितू हमरे,गोरख झोले ,प्रकाश दोंदे साहेब, उमाकांत हमरे ,सदानंद हमरे,आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रम पार पडल्यानंतर वाकडपाडा येथेही आद्यक्रांतीविर राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रदीप वाघ साहेब,भरत गारे गुरुजी ,सरपंच संजय वाघ ,पोलीस पाटील विठ्ठल गोडे डॉ. शिवाजी घोरपडे, चंदर बोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच काष्टी येथे ही आद्यक्रांतीविर राघोजी भांगरे याची जयंती साजरी करण्यात आली. यानंतर संध्याकाळी ७ वाजता ऊधळे येथे जिल्हा परिषदेच्या सदस्यां कुसुम ताई झोले यांच्या अध्यक्षतेखाली आद्यक्रांतीविर राघोजी भांगरे यांच्या जयंती निमित्त प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आद्यक्रांतीविर राघोजी भांगरे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारमंचाचे अध्यक्ष मा.संजय इधे सर ,सामाजिक कार्यकर्ते संजय साळवे ,सदानंद हमरे ,आदिवासी समाज संघटनाचे अध्यक्ष उमाकांत हमरे साहेब व जितू हमरे तसेच एकनाथ गवारी, धोंडीराम वाघ ,वामन गवारी,परशुराम गवारी,आशा सेविका संगिता ठाकूर मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते सदर कार्यकमचे सूत्रसंचालन युवा नेते मिलिद भाऊ झोले व सचिन पाटील यांनी केले.
विक्रमगड
प्रतिनिधी - अजय लहारे
_________