पुणेकरांना मोठा दिलासा; शहरातील रात्रीची संचारबंदी हटवली...| Great relief to the people of Pune; Night curfew in the city lifted...| pune night curfew

pune night curfew : करोनाच्या कचाट्यात सापडलेल्या पुणेकरांसाठी काहीशी दिलासा देणारी बातमी आहे. राज्य सरकारने १ ऑगस्टपासून नवीन गाइडलाइन्स जारी केल्या असून त्याला अनुसरून पुण्यात संचारबंदीबाबत नवा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणेकरांना मोठा दिलासा; शहरातील रात्रीची संचारबंदी हटवली...| Great relief to the people of Pune;  Night curfew in the city lifted...| pune night curfew
Pune Night Curfew Lifted.....

pune night curfew : 

पुणेकरांना मोठा दिलासा; शहरातील रात्रीची संचारबंदी हटवली...

करोनाच्या कचाट्यात सापडलेल्या पुणेकरांसाठी काहीशी दिलासा देणारी बातमी आहे. राज्य सरकारने १ ऑगस्टपासून नवीन गाइडलाइन्स जारी केल्या असून त्याला अनुसरून पुण्यात संचारबंदीबाबत नवा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे : करोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे शहरात रात्री नऊ ते पहाटे पाचपर्यंत असलेली संचारबंदी अखेर मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून असलेली संचारबंदी कमी झाल्याने नागरिकांना रात्रीही फिरता येणार आहे. पुणेकरांसाठी हा खूप मोठा दिलासा आहे. ( Pune Night Curfew Lifted ).

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर २४ मार्चनंतर लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. पूर्ण राज्यात २४ तास संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर एक जून पासून दिवसा असलेली संचारबंदी कमी करून फक्त रात्री नऊ ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी ठेवण्यात आली होती. रात्री संचारास प्रतिबंध घालण्यात आला होता. आता शासनाने एक ऑगस्टपासून संचारबंदीचा कोणताही आदेश काढलेला नाही. त्यामुळे नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. पण, रात्रीची संचारबंदी शासनाने मागे घेतल्यामुळे आदेश काढण्यात आला नसल्याचे समोर आले आहे. तरीही नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये. आवश्यक असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

शहरात रात्री असलेली संचारबंदी मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे कोणताही आदेश काढण्यात आलेला नाही. शहरात आता कोणत्याही प्रकारची संचारबंदी नाही - डॉ. के. व्यंकटेशम, पोलिस आयुक्त, पुणे.

पुण्यात करोनाचा धोका कायम : 

पुणे शहरातील करोनाचा धोका कायम आहे. शुक्रवारी शहरात ८१८ करोना पॉझिटिव्ह आढळले तर ३९ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या चिंता वाढल्या असतानाच, डिस्चार्जचे वाढते प्रमाण दिलासा देणारे ठरत आहे. शुक्रवारी दिवसभरात ११८५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे करोनावर यशस्वीपणे मात करणाऱ्या नागरिकांची संख्या ३५ हजारांवर जाऊन पोहोचली आहे. शहरातील ६२६ गंभीर रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत असून, त्यापैकी ३७६ जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. अडीचशे रुग्ण आयसीयूत करोनाशी लढत आहेत. ऑक्सिजनवर ठेवलेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनापुढे आव्हान निर्माण झाले आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटिजेन चाचण्यांची संख्या वाढवत आहे. शुक्रवारी दिवसभरात ६ हजार १५१ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे शहरात आतापर्यंत झालेल्या चाचण्यांची संख्या २ लाख ७३ हजार ३९२ वर जाऊन पोहोचली आहे.