अपेक्षित वेळे आधीच मान्सून पुण्यात

नैर्ऋत्य मोसमी वार्‍यांचा यंदा अंदमान ते महाराष्ट्रापर्यंतचा प्रवास वेगाने झाला. मात्र ,मान्सून महाराष्ट्रात दाखल होताच त्याचा वेग मंदावला होता.

अपेक्षित वेळे आधीच मान्सून पुण्यात
pune monsoon news

अपेक्षित वेळे आधीच मान्सून पुण्यात

नैर्ऋत्य मोसमी वार्‍यांचा  यंदा अंदमान ते महाराष्ट्रापर्यंतचा प्रवास वेगाने झाला. मात्र ,मान्सून महाराष्ट्रात दाखल होताच त्याचा वेग मंदावला होता. 

नियोजित वेळेच्या चार दिवस आधीच मान्सून पुण्यात दाखल झाला असून पुढील 4 ते 5 दिवस सर्वत्र जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवमान विभागाने वर्तवला आहे. पुणे येथील हवामान शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी ही माहिती दिली आहे.(Monsoon already in Pune at the expected time)


पुणे, अलिबागसह राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांत वेळेआधीच दाखल झालेला मान्सून दोन दिवसांपासून स्थिर होता. मात्र, बंगालच्या उपसागरात दोन दिवसांत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे मान्सून वार्‍यांना पुन्हा चालना मिळणार आहे.


अंदमान बेटांसह केरळातील आगमन लांबल्याने मान्सून यंदा 3 जून रोजी दक्षिण केरळात दाखल झाला. त्यानंतर अरबी समुद्रावरून वेगाने वाटचाल करत दोनच दिवसांत मान्सूनने महाराष्ट्रापर्यंत मजल मारली. नियोजित वेळेच्या चार दिवस आधीच मान्सून पुण्यात दाखल झाला. पुढील 4 ते 5 दिवस सर्वत्र जोरदार पाऊस होण्याचा अंदाज, असल्याची माहिती हवामान शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली आहे.


विदर्भात 15 जून पर्यंत मान्सूनचं आगमन होईल, असा हवामान विभागाचा अंदाज होता. मात्र, हवामान विभागाला हुलकावणी देत, आधीच मान्सून विदर्भात पोहचला. हवामान विभागानं विदर्भात मान्सूनचं आगमन झाल्याचं जाहीर केलंय. 11 तारखेपासून 13 तारखे पर्यंत विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं वर्तवलाय. मान्सूनच्या आगमनानं शेतकरी आणि सर्वसामान्य सुखवलाय. सोबतच या वर्षी चांगल्या पावसाचा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागानं 10 जून  साठी रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर पुढील चार दिवसांसाठी कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्गसाठी ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.


मान्सूनचा पाऊस शनिवारी महाराष्ट्रात दाखल झाला. मान्सूनच्या पावसानं जवळपास संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. उत्तर महाराष्ट्र किनारपट्टी ते उत्तर केरळ किनारपट्टी भागात द्रोणीय क्षेत्र तयार झाल्यानं पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.(Monsoon already in Pune at the expected time)

तर, पुणे जिल्ह्यातही पुढचे चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.