बळीराजा धरणाजवळ दिवाळीचा खरा इतिहास पुस्तकाचे प्रकाशन संपन्न...
निऋती प्रकाशन पुणे यांच्या वतीने प्रा.डॉ.राजेंद्र कुंभार लिखित दिवाळीचा खरा इतिहास या पुस्तकाचे प्रकाशन जलनायक भाई संपतराव पवार यांच्या हस्ते आज बळीराजा धरण परिसरात क्रांती स्म्रतीवन बलवडी येथे संप्पन्न झाले.
बळीराजा धरणाजवळ दिवाळीचा खरा इतिहास पुस्तकाचे प्रकाशन संपन्न...
निऋती प्रकाशन पुणे यांच्या वतीने प्रा.डॉ.राजेंद्र कुंभार लिखित दिवाळीचा खरा इतिहास या पुस्तकाचे प्रकाशन जलनायक भाई संपतराव पवार यांच्या हस्ते आज बळीराजा धरण परिसरात क्रांती स्म्रतीवन बलवडी येथे संप्पन्न झाले. याप्रसंगी क.महांकाळ तालुका बळीराजा महोत्सव समितीचे अध्यक्ष अविराजे शिंदे,संयोजक प्रा.दादासाहेब ढेरे,किसान सभेचे सरचिटणीस काँ.दिगंबर कांबळे,प्रगतिशील लेखक संघाचे जिल्हाध्यक्ष मारुती शिरतोडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष व कुची ग्राम पंचायत सदस्य सूरज पाटील,व लहुजी क्रांति मोर्चा सांगली जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथ सकट युवा विद्यार्थी हक्क संघर्ष समितीचे वैभव शिरतोडे,चैतन्य पाटील,किरण कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळीबोलताना भाई संपतराव पवार म्हणाले कीशेतकरी हाच देशाचा खरा शिल्पकार असून त्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर शास्वत काम उभे करावे लागेल. शिवाय त्यातही दुष्काळी भागातील शेतकरी कसा जगेल याचा प्राधान्यक्रमाने विचार व्हायला हवा.
बळिराजापार्टी महाराष्ट्र महासचिव बाळासाहेब रास्ते म्हणाले की कवठेमंकाळ येथे दिनांक 16 नोव्हेंबर 2020 रोजी बळीराजा महोत्सवाचे आयोजन केले असून यामध्ये बळीराजाची भव्यदिव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे शेती व शेतीसाठी विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना समितीच्या वतीने बळीराजा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे .या उत्सवासाठी भाई संपतराव पवार यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. बळीराजा महोत्सव समितीचे अध्यक्ष अविराजे शिंदे म्हणाले की भाई संपतराव पवार यांचे पाणी चळवळ व दुष्काळ निर्मूलन चळवळ यात झोकून दिलेले काम संपूर्ण देशाला दिशादर्शक असल्याचा पुरावा म्हणजेच अग्रणी नदीच्या कामासाठी जिल्हयाला जाहीर झालेला केंद्र सरकारचा पुरस्कार म्हणावा लागेल. संयोजक प्राध्यापक दादासाहेब ढेरे यांच्या हस्ते भाई संपतराव पवार यांचा शाल फेटा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक बाळासाहेब रास्ते यांनी केले तर आभार प्रा.दादासाहेब ढेरे यांनी मानले.
सांगली जिल्हा
प्रतिनिधि - जगन्नाथ सकट
_________