रायते शिवसेना जनसंपर्क कार्यालयात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना शिवसैनिकांनी केले अभिवादन... ! | गायक गणेश केमारी यांच्या गीतांनी वाहिली भावपूर्ण आदारांजली... !
नुकतच दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर कल्याणच्या सभापती अनिता वाकचौरे व जिल्हा परिषद सदस्या जयश्री सासे यांच्या हस्ते शुभारंभ झालेल्या कल्याण मुरबाड नगर राष्ट्रीय महामार्गावरील रायते गावातील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात १७ नोव्हेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा ८ वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.
रायते शिवसेना जनसंपर्क कार्यालयात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना शिवसैनिकांनी केले अभिवादन !
गायक गणेश केमारी यांच्या गीतांनी वाहिली भावपूर्ण आदारांजली !
नुकतच दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर कल्याणच्या सभापती अनिता वाकचौरे व जिल्हा परिषद सदस्या जयश्री सासे यांच्या हस्ते शुभारंभ झालेल्या कल्याण मुरबाड नगर राष्ट्रीय महामार्गावरील रायते गावातील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात १७ नोव्हेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा ८ वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. रायते गावातील शिवसेना विभागप्रमुख सुदाम भोईर यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपस्थित सर्व शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त यावेळी रायते गावचे सुपुत्र व सुप्रसिद्ध गायक गणेश केमारे यांच्या गीतांचा व भजनाचा कार्यक्रम आयोजित कटण्यात आला होता. यावेळी गायक गणेश केमारे यांनी आपल्या पहाडी आवाजात विविध भजने व पोवाडे सादर करून बाळासाहेबांना गीतरुपी आदरांजली अर्पण केली.
या गीत गायनामध्ये विजय कार्ले, महेश जाधव, भावेश केमारे, वैभव गोडांबे, प्रदीप घावट, हर्षल केमारे, सुनील गोडांबे, सोपान जाधव आदी गायक कलाकार मंडळीही सहभागी झाली होती. याप्रसंगी शिवसेना विभाग प्रमुख सुदाम भोईर, राम भिवा सुरोशी, संतोष सुरोशी, जेष्ठ नागरिक बाळकृष्ण भोईर, अमोल सुरोशी, सुभाष चौधरी, राजाराम भोईर, हेमंत सुरोशी, नितीन भोईर व अन्य गावकरी व शिवसैनिक आदी उपस्थित होते.
मुरबाड
प्रतिनिधी - लक्ष्मण पवार
___________