सार्वजनिक वाचनालयात सामुहिक श्रद्धांजली सभा संपन्न...
कल्याणमधील सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, डॉक्टर्स तसेच इतरही काही व्यक्तींचे निधन गेल्या काही महिन्यांत झाले. या सर्व दिवंगतांना सर्व साहित्यिक व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांच्यातर्फे रविवारी सार्वजनिक वाचनालय कल्याणच्या सभागृहात श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती.
सार्वजनिक वाचनालयात सामुहिक श्रद्धांजली सभा संपन्न...
कल्याण : कल्याणमधील सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, डॉक्टर्स तसेच इतरही काही व्यक्तींचे निधन गेल्या काही महिन्यांत झाले. या सर्व दिवंगतांना सर्व साहित्यिक व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांच्यातर्फे रविवारी सार्वजनिक वाचनालय कल्याणच्या सभागृहात श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती.
कोरोनाच्या महामारीने काय केलंय याचा आपल्याला विचार करावा लागणारा आहे. हा कोरोना दिसत नाही आणि हा अजून किती बळी घेईल हे ही माहित नाही. या व्यक्तींच्या जाण्याने आपल्याला त्याची पोकळी जाणवणार आहे तसेच त्यांचं काम नेहमी आपल्याला प्रेरणा देईल असं म्हणत सार्वजनिक वाचनालय कल्याणचे अध्यक्ष राजीव जोशी यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
महाराष्ट्र साहित्य परिषद कल्याण शाखेचे कार्याध्यक्ष व सार्वजनिक वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर म्हणाले कोरोनाच्या महामारीने जगावर, देशावर संकट आणलचं पण कल्याणकरांनाही या संकटाने घेरलं. माजी महापौर राजेंद्र देवळेकर हे सांस्कृतिक, सामाजिक, साहित्य संस्कृतीला लाभलेलं वरदान आहे अशी श्रद्धांजली अर्पण केली.
जेष्ठ पत्रकार तुषार राजे, अखिल भारतीय साहित्य परिषदेचे संजय त्रिवेदी, काव्य किरण मंडळाचे सागर राजे-निंबाळकर, पारनाका मित्र मंडळाचे महेश केळकर, सुधीर चित्ते, सतीश केतकर, सुमती घाणेकर, नेहा फणसे, संजीवनी जगताप, विवेक द्याहाडकर,ऋषिकेश जोगळेकर, नूतन शिक्षण संस्था, सहकार रती अशा अनेक संस्थांच्या प्रतिनिधींनी आपल्या शब्दांत सर्वांना श्रद्धांजली अर्पण केली असल्याची माहिती सार्वजनिक वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर यांनी दिली.
कल्याण, ठाणे
प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे
___________