सफाळा पोलीस स्टेशन तर्फे 'पब्लिक एड्रेसिंग सिस्टम' या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ..!

'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' या पोलीस दलाच्या 'ब्रीद' वाक्यास साजेशी कामगिरी सफाळा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी करुन दाखवीली आहे.

सफाळा पोलीस स्टेशन तर्फे 'पब्लिक एड्रेसिंग सिस्टम' या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ..!
Safala Police Station launches innovative initiative called 'Public Addressing System' ..!
सफाळा पोलीस स्टेशन तर्फे 'पब्लिक एड्रेसिंग सिस्टम' या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ..!
सफाळा पोलीस स्टेशन तर्फे 'पब्लिक एड्रेसिंग सिस्टम' या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ..!
सफाळा पोलीस स्टेशन तर्फे 'पब्लिक एड्रेसिंग सिस्टम' या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ..!

सफाळा पोलीस स्टेशन तर्फे 'पब्लिक एड्रेसिंग सिस्टम' या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ..!

        'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' या पोलीस दलाच्या 'ब्रीद' वाक्यास साजेशी कामगिरी सफाळा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी करुन दाखवीली आहे. दिवसेंदिवस पोलिस यंत्रणेवरील वाढता तांण लक्षात घेता 'कायदा व सुव्यवस्था' राखणे पोलीस प्रशासनास अतिशय जिकरिचे झाले आहे. 'करोना विषाणु'चा प्रादुर्भाव पाहता 'मास्क' व 'सोशल डिस्टनसिंग'चा वापर अनिवार्य झाला आहे. तथापी, सफाळा बाजारपेठेत वाढत असलेली लोकांची गर्दी, वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी व 'सोशल डिस्टनसिंग' हा विषय सफाळा वासीयांसाठी चींतेची बाब बनली आहे. दरम्यान, जनतेच्या आरोग्यच्या दृष्टीने, तसेच गुन्हेगारी प्रवृत्तिला आळा घालण्याकामी आणि बाजार पेठेच्या सूरळीत रहदारी व वाहतुकीकरीता सफाळा पोलीस स्टेशनने शुक्रवारी सपोनि जाधव यांच्या हस्ते 'पब्लिक एड्रेसिंग सिस्टीम' या कार्य प्रणालीचा वापर करुन अभिनव उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या 'पी.ए.सिस्टीम' अंतर्गत सफाळा बाजारपेठ हद्दित असलेले सर्व 'सी.सी.टी.व्ही' कॅमेरे यांचे नियंत्रण पोलिस ठाण्यात असून टी.व्ही.च्या स्क्रीनवर बाजारपेठेतील लाइव दृश्य दिसणार आहे. 

       दरम्यान रस्त्यात एखादा ट्रक किंवा बस अथवा इतर वाहनामुळे बाजारपेठेत वाहतूक कोंडी झाल्यास 'स्पीकर व माईक' सिस्टमद्वारे पोलिस ठाण्यातुनच संबधित वाहनाच्या नंबरनुसार वाहन चालकास तत्काल वाहन काढण्याबाबत सूचना देऊन वाहतूक कोंडीच्या समस्येचे निरसन केले जाणार आहे. या 'पब्लिक एड्रेसिंग' सिस्टीमचा शुभारंभ झाला असून संपूर्ण महाराष्ट्रात पोलिस दलात पहिल्यांदाच सफाळा पोलीस ठाणे येथे पी.ए.सिस्टम चा प्रयोग पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या पुढाकाराने करण्यात आला आहे. तथापी, पी.ए. सिस्टिम चा फायदा हा सफाळा परिसरातील नागरिकांना सर्वात जास्त होणार असून नागरिकांमध्ये आनंदाच वातावरण आहे. सफाळा पोलीस ठाण्यातर्फे जनतेला ही सुविधा उपलब्ध करुन दिल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करीत  पोलिस निरीक्षक सुनील जाधव यांच्या अभिनव उपक्रमाचे कौतुक करीत आभार मानले आहेत.

पालघर

प्रतिनिधी - राजेंद्र पाटील

___________