टिटवाळा येथे पोलिस भरतीसाठी मोफत प्रशिक्षण केंद्र सुरु...| जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम...
ठाणे पालघर सह संपूर्ण कोकणभर शैक्षणिक आरोग्य व सामाजिक काम करणारी जिजाऊ संस्था महाराष्ट्रातील संभाव्य पोलिस भरती लक्षात घेऊन संस्थापक अध्यक्ष निलेश भगवान सांबरे यांच्या मार्गदर्शनाने मोफत पोलिस भरती प्रशिक्षण केंद्र उभारत आहे.

टिटवाळा येथे पोलिस भरतीसाठी मोफत प्रशिक्षण केंद्र सुरु...
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम...
कल्याण : ठाणे पालघर सह संपूर्ण कोकणभर शैक्षणिक आरोग्य व सामाजिक काम करणारी जिजाऊ संस्था महाराष्ट्रातील संभाव्य पोलिस भरती लक्षात घेऊन संस्थापक अध्यक्ष निलेश भगवान सांबरे यांच्या मार्गदर्शनाने मोफत पोलिस भरती प्रशिक्षण केंद्र उभारत आहे. याच उपक्रमांतर्गत कल्याण तालुक्यातील टिटवाळा येथे पोलिस भरती प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले.
या उपक्रमास समाजातील आनेक तरुणांचा जिजाऊ संस्थेला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. यावेळी उपस्थित तरुणांना जिजाऊ संस्थेविषयी संस्थेचे अजित जाधव यांनी माहिती दिली. अरविंद देशमुख व कैलास पारधी यांनी पोलिस भरती विषयी मार्गदर्शन केले. मोनिका पानवे यांनी विद्यार्थ्यांनी न घाबरता मार्गक्रमण करत रहा जिजाऊ संस्था व संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे आपल्या सोबत सदैव उभे आहेत असा विश्वास दिला. तर धिरज निलेश सांबरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कल्याण, ठाणे
प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे
___________