पत्रकाराला धक्काबुक्की करणारा माथेरान पोलीस ठाण्याचा पोलीस कर्मचारी निलंबित..
पिंपरी चिंचवड येथील पत्रकारांशी उद्धटपणे वागणारया एका पोलीस निरिक्षकावर कालच निलंबनाची कारवाई झालेली असताना आज रायगडमध्ये त्याची पुनरावृत्ती झाली.
पत्रकाराला धक्काबुक्की करणारा माथेरान पोलीस ठाण्याचा पोलीस कर्मचारी निलंबित..
अलिबाग : पिंपरी चिंचवड येथील पत्रकारांशी उद्धटपणे वागणारया एका पोलीस निरिक्षकावर कालच निलंबनाची कारवाई झालेली असताना आज रायगडमध्ये त्याची पुनरावृत्ती झाली. माथेरानच्या पत्रकारास शिविगाळ आणि धक्काबुक्की करणारया एका पोलीस कर्मचारयास जिल्हा पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले आहे. मराठी पत्रकार परिषद आणि रायगड प्रेस क्लबचा आणि पत्रकारांच्या एकजुटीचा आणखी विजय झाला आहे..
माथेरान मधील पत्रकार दिनेश सुतार तसेच व्यापारी बिलाल महबळै यांना दारू पिऊन मारहाण करणारे माथेरान पोलीस ठाण्याचे पोलिस नाईक शाम जाधव यांच्यावर रायगङ पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांनी पुढील आदेश मिळे पर्यन्त निलंबनाची कारवाई केली आहे.
त्यांनाआठवड्यातून दोन वेळा अलिबाग येथे हजेरी लावण्याचे आदेश दिले असून या प्रकरणाची चौकशी पूर्ण होइपर्यंत निलंबन कायम राहणार असून पोलीस कर्मचारी जाधव यांच्यावर कारवाई होइपर्यंत पत्रकारांचे आंदोलन सुरू राहणार आहे. परंतु पत्रकारांचा आवाज लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांचे घेतलेल्या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
मुंबई
प्रतिनिधी - संजय बोर्डे
___________