नारी सुरक्षितता...!!!!

नारीला वाचवा ... त्यांना फक्त आदरयुक्त, सुरक्षित जीवन पाहिजे आहे ...

नारी सुरक्षितता...!!!!
Save Womens... All they need is a Respectfull secure life...

जीभ तुझी कापली आणि 
वाचा सत्ताधाऱ्यांची गेली..


अत्याचार तुझ्यावर झाला
आणि डोळा दिल्लीश्वरांचा आंधळा झाला..


कुटुंबियांना न सांगता देह तुझा पेटवण्यात आला
आणि
अंत्यसंस्कार मात्र संविधानावर करण्याचा प्रयत्न झाला..


बेटी बचाव हे ब्रीदवाक्य आहे की इशारा..
हे कोणी सांगेल का समाजाला.


दरवेळी जाते आपल्या आया व बहिणीची आब्रू..
तिने कसे जगावे बिनधास्त व नये कोणास ही घाबरू..


सत्तापिसासू व निर्दयी लोक बसलेत सत्तेच्या गादीवर
लवकरच लोक हकलतील त्यांना व  बसवलीतल गल्लीतल्या नाक्यावर.


स्वयंघोषित चौकीदार चमकोगिरीतच व्यस्त आहे..
आमच्या आया व बहिणी तुमच्या राज्यात त्रस्त आहेत.

 

 ✒️लेखक✒️
अनिल भास्करराव काकडे
    
   नविमुंबई प्रतिनिधी