भारतात पेट्रोल शंभरी पार

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत.

भारतात पेट्रोल शंभरी पार
petrol price in world

भारतात पेट्रोल शंभरी पार

Hundreds of petrol in India

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर हे 100 रुपयांच्या पुढे पोहोचले आहेत. देशातील सर्वात मोठी तेल मार्केटिंग कंपनी आयओसी IOC  च्या मते मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये पेट्रोलचे दर 102 रुपये प्रतिलीटर पर्यंत पोहोचले आहे.

तर महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल हे परभणीत पाहायला मिळत आहे. परभणीमध्ये पेट्रोलचा दर हा 100 इतका आहे. त्यापाठोपाठ नांदेडमध्ये 99.73 रुपये किंमतीने पेट्रोलची विक्री होत आहे. त्याशिवाय परभणीत डिझेलची विक्री सार्वाधिक दराने होत आहे. परभणी शहरात डिझेलचा दर 89.79 रुपये इतका आहे.

यंदा जानेवारीत पेट्रोल-डिझेलचे दर 10 वेळा तर फेब्रुवारीत 16 वेळा दर वाढले आहेत. त्याचवेळी मार्च महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 3 वेळा आणि एप्रिलमध्ये 1 वेळा कमी झाली आहे. या महिन्यात आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 5 पटीने वाढ झाली आहे. तसेच येत्या काही दिवसात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पण जगातील काही देशात पेट्रोलचे दर हे पाण्यापेक्षाही कमी आहेत वाचून आश्चर्य वाटलं ना

Global Petrol Price.com नुसार, व्हेनेझुएलामध्ये पेट्रोलची किंमत सर्वात कमी आहे. या ठिकाणी पेट्रोलची किंमत प्रतिलीटरची फक्त 1.477 रुपये इतकी आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी एक लीटर पिण्याच्या पाण्याची बाटली 20-25 रुपयांमध्ये उपलब्ध असते. पण त्या तुलनेत एक लिटर पेट्रोलची किंमत फक्त 1.47 रुपये इतकी आहे.

20 व्या शतकाच्या सुरूवातीच्या काळात व्हेनेझुएलामध्ये कच्च्या तेलाचा शोध लागला. सध्या व्हेनेझुएलामध्ये जगातील सर्वात मोठा तेल साठा आहे. त्यामुळे येथे पेट्रोलची किंमत खूपच कमी आहे. हा देश कॉफी आणि कोकोसारख्या कृषी वस्तूंचा अविकसित निर्यात करत होता. पण त्यानंतर काही काळातच तेल निर्यात आणि सरकारी कमाईचा सर्वात मोठा स्रोत बनला.

दोन वर्षांपूर्वीपर्यंत सौदी अरेबिया आणि इराकनंतर इराण हा भारताचा तिसरा सर्वात मोठा तेल पुरवठा करणारा देश ठरला होता. एका अहवालानुसार कच्च्या तेलाच्या साठ्याच्या बाबतीत इराण हा चौथ्या क्रमांकावर आहे. इराणमध्ये 150 अब्ज बॅरलपेक्षा जास्त कच्च्या तेलाचा साठा आहे.

नवीन तेलाच्या क्षेत्राचा शोध लागल्यावर इराणने कॅनडाला मागे टाकत तिसऱ्या क्रमांकावर स्थान निर्माण केले. तज्ज्ञांचे म्हणण्यानुसार, या ठिकाणी मोठ्या साठ्यामुळे कच्चे तेल आयात करावे लागत नाही. पेट्रोल डिझेल बनविण्यावरील खर्च खूप कमी आहे. म्हणूनच तेथे किंमती फारच कमी आहेत.

अंगोला हा आफ्रिकन देशांमध्ये कच्च्या तेलाच्या निर्यात करणारा नवव्या क्रमांकाचा देश आहे. एका अहवालानुसार, 2017 मध्ये अंगोलाने 30.5 अब्ज डॉलर तेल निर्यात केले होते.