भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजनेचा सन २०१९-२० चा प्रलंबीत निधी विद्यार्थ्यांना त्वरित उपलब्ध करून द्या अन्यथा सामाजिक न्याय मंत्र्यांना घेराव घालणार ... - वंचित बहूजन आघाडी 

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती पहिला टप्पा मंजूर करताना अपुरी तरतूद करण्यात आली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी वंचित असून ह्या योजनेचा सन २०१९-२० चा प्रलंबीत निधी विद्यार्थ्यांना त्वरित उपलब्ध करून द्यावा अन्यथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे ह्यांना घेराव घालु असा इशारा  वंचित बहूजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव आणि पक्ष प्रवक्ते राजेंद्र पातोडे ह्यांनी दिला आहे

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजनेचा सन २०१९-२० चा प्रलंबीत निधी विद्यार्थ्यांना त्वरित उपलब्ध करून द्या अन्यथा सामाजिक न्याय मंत्र्यांना घेराव घालणार ... - वंचित बहूजन आघाडी 
Make available the pending funds of Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Scholarship Scheme for the year 2019-20 to the students immediately, otherwise the Minister of Social Justice will be besieged ... - Deprived Bahujan Aghadi

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजनेचा सन २०१९-२० चा प्रलंबीत निधी विद्यार्थ्यांना त्वरित उपलब्ध करून द्या अन्यथा सामाजिक न्याय मंत्र्यांना घेराव घालणार ... - वंचित बहूजन आघाडी 

मुंबई दि. २ - भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती पहिला टप्पा मंजूर करताना अपुरी तरतूद करण्यात आली.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी वंचित असून ह्या योजनेचा सन २०१९-२० चा प्रलंबीत निधी विद्यार्थ्यांना त्वरित उपलब्ध करून द्यावा अन्यथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे ह्यांना घेराव घालु असा इशारा  वंचित बहूजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव आणि पक्ष प्रवक्ते राजेंद्र पातोडे ह्यांनी दिला आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,शासन निर्णय क्रमांक बिसीएच २०२०/प्र. क्र.१२०/शिक्षण-२.दि.२८.८.२०२०तसेच वित्त विभाग,शासन निर्णय, क्र.अर्थ.सं-२०२०/प. क्र.६५/अर्थ-३. दि.०४/०५/२०२० नुसार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना लेखाशीर्ष २२२५ ई ७७,३१ सहायक अनुदाने या लेखाशिर्षाखाली सन २०२०-२१ आर्थिक वर्षात रू.१००००.०० लक्ष ( अक्षरी शंभर कोटी रुपये) इतकी अल्प तरतूद अर्थसंकल्पीत करण्यात आली होती.सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील मंजूर अर्थसंकल्पीत तरतुदींच्या  ३५% म्हणजेच ३५ कोटी रुपये निधी वितरित केला असून तो लवकरच संबधित विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होईल.

असे आश्वासन राज्यमंत्री  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक २८-०८-२०२० रोजी दिले होते.तथापि अजुन दोन महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटला असून विद्यार्थ्यांच्या खात्यात त्यांचा हक्काचा निधी मिळालेला नाही.एवढेच नाही तर सन २०१९-२० चा दुसरा हप्ता अजुन विद्यार्थ्यांना मिळालेला नाही आहे.विद्यार्थी वारंवार निवेदन आणि विनंती अर्ज देत आहेत.

मात्र सामाजिक न्याय खात्याला जाग येत नाही.विद्यार्थ्यांना निराशा आलेली असून विद्यार्थी  टोकाची भूमिका घेऊ शकतात ह्याची सरकारला जाणीव आहे.परंतु जाणीवपूर्वक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वंचीत ठेवण्यात येत आहे.
सामाजिक न्याय मंत्री हे गेले अनेक दिवस अज्ञातवासात असून त्यांचे आपल्या खात्यावर अजिबात लक्ष नसल्याचे दिसत आहे.

महाराष्ट्र सरकारचे हे धोरण संतापजनक आहे.सामाजिक न्याय विभागाने तातडीने ह्यावर निर्णय घेऊन उर्वरित निधी उपलब्ध करून द्यावा.अन्यथा महाराष्ट्र भर सरकारच्या विरुद्ध निदर्शने करीत सामाजिक न्याय मंत्र्यांना युवा आघाडीच्या वतीने घेराव घालू असा इशारा वंचित बहूजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव आणि प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे ह्यांनी दिला आहे.

बीड

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत 

___________