एकलारे येथील सुपुत्र पार्थ संखे यांचे अल्पशा आजाराने निधन...
पालघर तालुक्यातील एकलारे गावचे सुपुत्र आणि सध्या पालघरचे रहिवाशी असलेले कै. पार्थ कल्पेश संखे यांना शुक्रवार, ११ नोव्हेंबर रोजी वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी अल्पशा आजाराने मृत्यूला सामोरे जावे लागले.
एकलारे येथील सुपुत्र पार्थ संखे यांचे अल्पशा आजाराने निधन...
पालघर तालुक्यातील एकलारे गावचे सुपुत्र आणि सध्या पालघरचे रहिवाशी असलेले कै. पार्थ कल्पेश संखे यांना शुक्रवार, ११ नोव्हेंबर रोजी वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी अल्पशा आजाराने मृत्यूला सामोरे जावे लागले. संखे परिवारात सर्वांचा आवडता असणारा पार्थ एकाएकी अकस्मात सर्वांना सोडून गेल्याने त्याचे आई-वडील, बहीण व संखे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्याच्या आठवणींना उजाळा देत सर्वच त्याचे स्मरण करत असून कल्पेश गंगाधर संखे व कल्पिता कल्पेश संखे यांचा आवडता मुलगा व तेजस्वी कल्पेश संखे हीचा अतिशय आवडता भाऊ कै. पार्थ अकस्मात देवा घरी गेल्यामुळे त्यांच्या दुःख कोणीही सहभागी होऊ शकत नाहीत.
परंतु निसर्गाच्या कालचक्रापुढे कोणाचे ही चालत नाही, हेच खरे आहे. एवढ्या अल्प वयात कै. पार्थ याचे निधन झाल्यामुळे परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत, आणि देवाकडे एकच मागणे मागत आहेत. देवा आमच्या पार्थला चांगली सद्गति मिळो, आणि ईश्वर चरणी चांगली जागा मिळो, हीच प्रार्थना व भावपूर्ण श्रद्धांजली...
पालघर
प्रतिनिधी - राजेंद्र पाटील
___________