तलासरीत अवघ्या बारा हजार रुपयांसाठी तेल व्यापाऱ्यांच्या मुलाची हत्या, पालघर पोलिसांनी लावला हत्येचा तपास, दोन आरोपींना अटक

अवघ्या बारा हजार रुपयांसाठी गुजरात मधील उंबरगाव येथील तेल व्यापाऱ्यांच्या मुलाची पालघरमध्ये तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत निर्घुण हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

तलासरीत अवघ्या बारा हजार रुपयांसाठी तेल व्यापाऱ्यांच्या मुलाची हत्या, पालघर पोलिसांनी लावला हत्येचा तपास, दोन आरोपींना अटक...

अवघ्या बारा हजार रुपयांसाठी गुजरात मधील उंबरगाव येथील तेल व्यापाऱ्यांच्या मुलाची पालघरमध्ये तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत निर्घुण हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. काही दिवसांपूर्वी तलासरी येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुर्झे डॅममध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता.

त्यानंतर याचा तपास पालघर स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून सदर तरुणाची हत्या झाल्याचे उघड झालंय, निलेश उर्फ दिनेश सुनील रावल हा २९ वर्षीय तरुण आपल्या तेल व्यापारी असलेल्या वडिलांच्या उधारीचे पैसे घेण्यासाठी तलासरीत येत असे, याची माहिती घेऊन दोन्ही आरोपींनी त्याची निर्घृण हत्या करून मृतदेह दगडाला बांधून कुर्झे डॅममध्ये फेकून दिला. मात्र तपासा अंती दिनेश याची अवघ्या बारा हजार रुपयांसाठी निर्घृण हत्या झाल्याचे उघड झाल्याने आरोपीतांवर कलम ३०२, २०१, ३६४ व ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केलीय.

पालघर

प्रतिनिधी - राजेंद्र पाटील

___________