विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगाlर युनियनच्या 43 व्या वर्धापन दिना निमित्य भव्य  रक्तदान शिबिराचे आयोजन...

परळी वैजनाथ  विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचा  43 वा वर्धापन दिन 04 सप्टेंबर 2020 रोजी  उत्साहात महाराष्ट्रभर विविध ठिकाणी तिन्ही वीज कंपन्यांमध्ये महानिर्मिती , महापारेशन ,व महावितरण मध्ये  संपन्न झाला.

विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगाlर युनियनच्या 43 व्या वर्धापन दिना निमित्य भव्य  रक्तदान शिबिराचे आयोजन...
Organizing a grand blood donation camp on the occasion of the 43rd anniversary of the Power Sector Technical Workers Union ...

विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगाlर युनियनच्या 43 व्या वर्धापन दिना निमित्य भव्य  रक्तदान शिबिराचे आयोजन...

परळी वैजनाथ  विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचा  43 वा वर्धापन दिन 04 सप्टेंबर 2020 रोजी  उत्साहात महाराष्ट्रभर विविध ठिकाणी तिन्ही वीज कंपन्यांमध्ये महानिर्मिती , महापारेशन ,व महावितरण मध्ये  संपन्न झाला. या वर्षी संघटनेने  महाराष्ट्रभर वर्धापन दिनानिमित्य ठिकठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन 28 ऑगस्ट ते 04 सप्टेंबर 2020 या सप्ताहात केले होते त्यावेळी जवळ जवळ 6700 बॅग रक्त संकलित झाले व राज्यात निर्माण झालेला तुटवडा कमी करण्यासाठी संघटनेने एक सामाजिक बांधिलकी म्हणून काम केले.

आता दुसऱ्या टप्प्यात पण संघटनेने रक्तदान शिबीर घेण्याचे आवाहन संघटनेच्या केंद्रीय पदाधिकारी केल्या नंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी  रक्तदान शिबिराचे अयोजन 31 डिसेंबर 2020 पूर्वी घेण्याचे ठरविले आहे त्यानुसार औष्णिक विद्युत केंद्र परळी वै. येथे संघटनेच्या वतीने शक्तीकुंज वसाहतीमधील दवाखान्यामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक 28 डिसेंबर सोमवार रोजी सकाळी 10-00 ते सायंकाळी 05-00 वाजेपर्यंत केले आहे.

तरी औष्णिक विद्युत केंद्रातील रक्तदाते कर्मचारी वअधिकारी बंधू यांनी जास्तीत जास्त  संख्येने या शिबिरात आपला सहभाग नोंदवून मोठ्या संख्येने रक्तदान करावे असे विनंती आवाहन संघटनेचे राज्यसचिव श्री हरीराम गित्ते यांनी केले आहे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत या शिबिरामधील रक्त संकलित करण्यासाठी अंबाजोगाई येथील शासकीय स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय ग्रामीण रुग्णालय  येथील रक्तपेढी तील वैद्यकीय कर्मचारी व त्यांची टीम परळी येथे येणार आहे अशी माहिती संघटनेचे  राज्यसचिव  हरीराम गित्ते यांनी दिली आहे.

बीड

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत 

___________