बापरे फक्त 14 लाख डोस शिल्लक..

महाराष्ट्रात कोरोना लसीचे फक्त 14 लाख डोस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे दिवसाला पाच लाख डोस द्यायचं म्हटलं तर केवळ तीनच दिवस लस पुरणार. तीन दिवसांनी महाराष्ट्रातील लसीकरण मोहीम ठप्प होईल, अशी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.

बापरे फक्त 14 लाख डोस शिल्लक..
only 14 lakh vaccine left

बापरे फक्त 14 लाख डोस शिल्लक;


 मुंबई, पुण्यासह इतर जिल्ह्यातील परिस्थिती काय?

महाराष्ट्रात कोरोना लसीचे फक्त 14 लाख डोस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे दिवसाला पाच लाख डोस द्यायचं म्हटलं तर केवळ तीनच दिवस लस पुरणार. तीन दिवसांनी महाराष्ट्रातील लसीकरण मोहीम ठप्प होईल, अशी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने दर आठवड्याला किमान 40 लाख लस पुरवठा केला पाहिजे. त्यामुळेच दिवसाला सहा लसीचं उद्दिष्ट पूर्ण होऊ शकेल, असंही राजेश टोपे म्हणाले.

मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोना लसीचा तुटवडा असल्याने . परिणामी लसीकरण मोहीमेत अडचणी निर्माण होत आहे. एक नजर टाकूया कोणत्या जिल्ह्यात किती दिवसांचा साठा शिल्लक आहे.

कोरोना लसीचा पुढचा साठा येईपर्यंत मुंबईत केवळ 1 लाख 85 हजार डोस  शिल्लक आहेत. कोविशील्डचे 1 लाख 76 हजार 540 तर कोवॅक्सिनचे केवळ 8840 डोस शिल्लक आहे. त्यामुळे वॅक्सिनचा दुसरा डोस घेणाऱ्यांची अडचण होण्याचीही शक्यता आहे. प्रत्यक्षात मुंबईची गरज ही 8 ते 10 लाख डोसची गरज असते. यापैकी 5 ते 6 लाख रिझर्व्हमध्ये साठा हवा पाहिजे. 5 लाखांपेक्षा कमी स्टॉक झाला तर त्याचा लसीकरण मोहिमेच्या वेगाला फटका बसतो. पुढचा साठा 15 एप्रिलला येणार असून तोही अपुराच पडणार आहे. मुंबईत 108 लसीकरण केंद्रे आहेत, तर दर दिवसाला सरासरी 50 हजार लोकांचे लसीकरण होते. लसीचा साठा मुंबईतील 108 केंद्रांवर समसमान वाटला गेला तर 1500 ते 1600 डोस सेंटरच्या वाट्याला येतात. मात्र, बीकेसीसारखे जम्बो लसीकरण केंद्र असेल किंवा खाजगी हॉस्पिटल ने पैसे भरुन जास्त लस ताब्यात घेतल्या तर लसींचा हा साठा अपुरा पडतो.

पुण्यात दोन दिवस पुरेल एवढाच साठा आहे.
पुणे जिल्ह्यातही कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. पुण्यात काल 53 हजार 368 जणांनाच लस देण्यात आली. तर परवा म्हणजे  जिल्ह्यातील 85 हजार 146 जणांना लस दिली. मात्र त्यानंतर लस अपुरी पडू लागल्याने मंगळवारी लसीकरणाचे हे प्रमाण 53 हजारांवर येऊन थांबलं. सध्या पुणे जिल्ह्यात कोरोना  लसीचे 1 लाख 10 हजार डोस शिल्लक आहेत, जे जास्तीत जास्त दोन दिवस पुरु शकतील.

पुणे जिल्ह्यात दररोज किमान एक लाख जणांना लस देण्याची तयारी आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आली आहे. मात्र लसीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे हे लक्ष साध्य होत नाही.