अकरावीसाठी आजपासून ऑनलाइन धडे...

शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने सोमवारपासून राज्यातील इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांना 80 शिक्षक ऑनलाइन शिक्षण देणार आहेत. यासाठी राज्यातून 60 हजार 360 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. यामुळे आठ महिन्यांपासून शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

अकरावीसाठी आजपासून ऑनलाइन धडे...
Online lessons for the eleventh starts from today ...

अकरावीसाठी आजपासून ऑनलाइन धडे...

पिंपरी : शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने सोमवारपासून राज्यातील इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांना 80 शिक्षक ऑनलाइन शिक्षण देणार आहेत. यासाठी राज्यातून 60 हजार 360 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. यामुळे आठ महिन्यांपासून शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा
मिळणार आहे.

मार्चमध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल करोनाच्या संकटामुळे उशिरा लागला होता. त्यामुळे इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविण्यासही उशीर झाला होता. प्रवेशाची पहिली ऑनलाइन फेरी पूर्ण झाली आहे. दुसऱ्या फेरीची गुणवत्ता जाहीर होणार, तोच सर्वोच्च न्यायालयाना मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया थांबविण्यात आलेली आहे. आता राज्य शासनाकडून आदेश आल्यानंतरच प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा, महाविद्यालये बंदच आहेत. त्यामुळे हे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेरच आहेत. या विद्यार्थ्यांना आता शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विद्या प्राधिकरणाचे संचालक दिनकर पाटील यांच्या पुढाकाराने ऑनलाइन शिक्षण देण्याबाबतचे नियोजन केले आहे.

कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी या सुविधेबाबतची माहिती विद्यार्थ्यांना देणे आवश्‍यक आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गाचे वेळापत्रक व तपशील ई-मेल, मोबाइलवर पाठवण्यात येणार आहे. अकरावीत प्रवेश घेतलेल्या व प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचा लाभ घेता येणार आहे. युट्युबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विषयनिहाय व्हिडिओ ही उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. महाविद्यालये प्रत्यक्षात सुरू होईपर्यंत हे ऑनलाइन मराठी, इंग्रजी माध्यमातून सुरूच ठेवण्यात येणार आहे.

ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी / शाखाविद्यार्थ्यांची नोंदणी

– कला (मराठी माध्यम)4,527
– कला (इंग्रजी माध्यम)2,337
– वाणिज्य (मराठी माध्यम)5,355
– वाणिज्य (इंग्रजी माध्यम)12,956
– विज्ञान (इंग्रजी माध्यम)35,185

लोहगाव , पुणे

प्रतिनिधी - आत्माराम काळे

__________