परळीत जिवंत काडतुसासह गावठी पिस्तुल जप्त एका आरोपीस अटक...

परळीत एक गावठी पिस्तूल व जिवंत काडतुस  बाळगणाऱ्यास  पोलीसांनी कारवाई करत अटक केली आहे. संभाजीनगर पोलीसांनी ही कामगिरी केली.

परळीत जिवंत काडतुसासह गावठी पिस्तुल जप्त एका आरोपीस अटक...
One accused arrested in Parli with live cartridges...

परळीत जिवंत काडतुसासह गावठी पिस्तुल जप्त एका आरोपीस अटक...

परळीत एक गावठी पिस्तूल व जिवंत काडतुस  बाळगणाऱ्यास  पोलीसांनी कारवाई करत अटक केली आहे. संभाजीनगर पोलीसांनी ही कामगिरी केली.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, आरोपी राहुल सुदाम चाळक वय ३० वर्षे रा.दर्गा रोड परभणी हा गावठी पिस्तूल व जिवंत काडतुस घेवुन परळी बस स्थानक परिसरात फिरत असल्याती माहिती पोलीसांना मिळाल्यावर पोलीसांनी त्यास ताब्यात घेवुन झडती घेतली असता त्याच्या जवळ गावठी पिस्तुल व एक जिवंत काडतुस  आढळून आले.

पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेवुन विचारपुस केली असता  आरोपीने अनधिकृतरित्या याची खरेदी हिरासिंग प्रेमसिंग जुन्नी या.फुलेनगर याच्याकडून केल्याची माहिती दिली सुमारे १५हजार५०० रुपयांचा ऐवज पोलीसांनी आरोपीलाअटक करून 15 हजार 500 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी  पोलीस नाईक विष्णु बाजीराव सानप यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई संभाजी पोलीस स्टेशनचे पो.नि. बी.एन.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली  करण्यात आली असून अधिक तपास पो.ह.आर.एम.राठोड हे करीत आहेत.

बीड

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत 

___________