स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त पारनाका येथे अभिवादन...

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने पारनाका, कल्याण पश्चिम येथे युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमा नरेंद्र पवार यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त पारनाका येथे अभिवादन...
Greetings at Parnaka on the occasion of Swami Vivekananda's birthday ...
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त पारनाका येथे अभिवादन...

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त पारनाका येथे अभिवादन...

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने पारनाका, कल्याण पश्चिम येथे युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमा नरेंद्र पवार यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

युवकांना प्रोत्साहित करणारे आणि युवकांना स्वप्नं पूर्ण करण्यासाठी त्या दिशेने चालायला लागा असा संदेश देणारे स्वामी विवेकानंद हे भारतालाच नव्हे तर अवघ्या जगाला मिळालेले महान व्यक्ती आहेत. युवकांना संघटित करून परिवर्तन आणि उज्वल भारत घडविण्याचे त्यांचे स्वप्न होते, आत्मनिर्भर भारताचेही बीज स्वामीजींच्या विचारातच रुजले होते. युवकांनी त्यांचे विचार आपल्या जीवनात अंगिकारले तर भारत सुजलाम सुफलाम होईल असे मत कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमा नरेंद्र पवार यांनी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी माधवी फोपळे, उपसचिव किशोर शेळके, प्रभाग अधिकारी भागाजी भांगरे आदी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

कल्याण, ठाणे

प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे 

___________