६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त म्हैसगाव मधून डॉ. आंबेडकरांना अभिवादन...| डॉ. आंबेडकरांच्या मूर्तीसाठी ५ हजाराची देणगी...
कोरोनानिमित्त यंदा चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी प्रत्यक्ष हजर न राहता घरून अभिवादन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते.

६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त म्हैसगाव मधून डॉ. आंबेडकरांना अभिवादन...
डॉ. आंबेडकरांच्या मूर्तीसाठी ५ हजाराची देणगी...
( शिरसगाव बोडखा विशेष प्रतिनिधी आदेश उबाळे यांच्याकडून )
म्हैसगाव : कोरोनानिमित्त यंदा चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी प्रत्यक्ष हजर न राहता घरून अभिवादन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. याला प्रतिसाद देत दि. ६ डिसेंबर रोजी म्हैसगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक विहारामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपसरपंच सागर दुधाट, सामाजिक कार्यकर्ते अरुण पवार, वनरक्षक विकास मोरे, नानासाहेब विधाटे, हिरामण बर्डे, विजय विधाटे, महादू चोपडे, दौलत विधाटे, पत्रकार सागर दोंदे, बौद्धांचार्य मोहन विधाटे, अण्णासाहेब विधाटे, कोंडीराम बर्डे, अरुण विधाटे, बाबुराव विधाटे यांसह आदी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेमुळेच सर्वसामान्यांच्या मुलामुलींना नोकरी मिळाली, महिलांना त्यांचे हक्क अधिकार मिळाले, बाबासाहेबांनी स्वतःचे सारे जीवन समाजहितासाठी खर्चिक केले म्हणून त्यांचे जीवनचरित्र समजून घेणे गरजेचे आहे. असे मत वनरक्षक विकास मोरे यांनी व्यक्त केले.
सामाजिक कार्यकर्ते अरुण पवार म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाज्याचे नसून साऱ्या भारतवासीयांचे नेते आहेत. त्याच्यामुळे राजकारण, समाजकारण करता येते. बाबासाहेबांना अंगीकृत केल्यास गावात भांडणतंटे होणार नाही. महापुरुषांचे विचार तळागाळापर्यंत रुजण्यासाठी यापुढे गावपातळीवर अभिनव उपक्रम राबविण्यात येईल. एवढेच नव्हे तर, डॉ. आंबेडकरांच्या मुर्तीसाठी पाच हजाराची रक्कम देणार असल्याचे पवार यांनी सांगितले आहे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी ६ डिसेंबर रोजी बहूसंख्येने अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर जात असतात. यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६४ वा महापरिनिर्वाण दिन आहे. कोरोनामुळे गर्दी टाळण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले असून, निर्बंधही घातले आहेत. त्यामुळे वर्षानुवर्षे न चुकता चैत्यभूमीवर जाणारे तरुण अनुयायी यावेळी दादर चैत्यभूमीला गेले नाही.
पुणे
प्रतिनिधी - आत्माराम काळे
___________