"ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन"
ओबीसी-व्हीजेएनटी प्रवर्गाच्या विविध संघटना आपल्या संविधानिक न्याय्य मागण्या बाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहेत.

"ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन"
ओबीसी-व्हीजेएनटी प्रवर्गाच्या विविध संघटना आपल्या संविधानिक न्याय्य मागण्या बाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहेत. ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास जातींचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत याची आपल्याला कल्पना आहेच. उद्भवलेल्या परिस्थितीचा ओबीसी आणि एकंदरीत सर्वसामान्य विद्यार्थी, परिक्षार्थी आणि सरळसेवा भरती प्रक्रियेवर परिणाम झालेला दिसून येत आहे. समाजाने राज्यात "ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन" सुरू केलेले आहे. ओबीसींचे सर्व प्रश्न सुटेपर्यंत वेगवेगळ्या मार्गाने आंदोलने सुरूच राहणार असून याच आंदोलनाचा भाग म्हणून उद्या दि. ३ नोव्हें. २०२० रोजी राज्यातील सर्व तहसिलदारांमार्फ सरकार ला निवेदन देणार आहोत.
स्थळ : पुणे जिल्हाधिकारी कार्यालय
दि : ३ नोव्हेंबर २०२०
वेळ : सकाळी ११-१२.०० वा
बीड
प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत
_________