राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांची प्रकृती चिंतजनक...

आमदार भारत भालके यांची प्रकृती खूप खूप चिंताजनक बनली आहे. त्यांची प्रकृती सुधारावी यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत तथापी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची शक्‍यता खूप कमी आहे.

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके  यांची प्रकृती चिंतजनक...
NCP MLA Bharat Bhalke's health is worrying ...

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके  यांची प्रकृती चिंतजनक...

आमदार भारत भालके यांची प्रकृती खूप खूप चिंताजनक बनली आहे. त्यांची प्रकृती सुधारावी यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत तथापी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची शक्‍यता खूप कमी आहे.अशी माहिती पुण्यातील रुबी हॉल क्‍लिनिकचे प्रमुख डॉ.ग्रॅंड यांनी पत्रकारांना दिली. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन श्री.भालके यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

आमदार भारत भालके यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना पुण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. बरे झाल्यानंतर एक दिवस ते पंढरपूर येथे आले होते, परंतु पुन्हा त्यांना त्रास जाणवू लागल्याने पुन्हा पुण्यात त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

बारामती

रूपेश महादेव नामदास

___________