सिमेंट रस्त्याच्या नावाखाली राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची अरेरावीची भाषा आणि अर्वाच्च भाषेचा वापर ... | नगर सेवक म्हणतात मी करेल तेच खरे ... काय करायचे ते करून घ्या ... नगर सेवकांची मन मानीकडे वरिष्ठ आधिकारी लक्ष देतील का ?
मोरे जाईबाई जानबा रा. रामेश्वर कॉलनी, भक्ती कन्स्ट्रक्शन, बीड येथे दिनांक 13 जानेवारी 2021रोजी नगरसेवक व त्यांचे कार्यकर्ते सिमेंट रस्ता पाहण्यासाठी आले असता अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून मोरे कुटुंब आणि नगरसेवक रमेश चव्हाण यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली.

सिमेंट रस्त्याच्या नावाखाली राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची अरेरावीची भाषा आणि अर्वाच्च भाषेचा वापर ....
नगर सेवक म्हणतात मी करेल तेच खरे ... काय करायचे ते करून घ्या ... नगर सेवकांची मन मानीकडे
वरिष्ठ आधिकारी लक्ष देतील का ?
बीड : मोरे जाईबाई जानबा रा. रामेश्वर कॉलनी, भक्ती कन्स्ट्रक्शन, बीड येथे दिनांक 13 जानेवारी 2021रोजी नगरसेवक व त्यांचे कार्यकर्ते सिमेंट रस्ता पाहण्यासाठी आले असता अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून मोरे कुटुंब आणि नगरसेवक रमेश चव्हाण यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. यावर नगरसेवक रमेश चव्हाण यांनी अरेरावीची भाषा करत अर्वाच्च भाषेचा वापर केला. मग्रुरी एवढी की, मी इथला मालक आहे मी काही करू शकतो अशी धमकी देऊन जाईबाई मोरे यांच्या घरासमोरील सिमेंट रस्ता करण्यास नकार दिला. तुम्ही कोणाकडेही जाऊ शकता, तुम्हाला काय करायचे ते करा, मी सिमेंट रस्ता करणार नाही अशी धमकी दिली.
जाईबाई मोरे यांच्या घरापाशी रस्ता ब्लॉक होतो त्यामुळे फुलझाडे लावण्याच्या उद्देशाने समोर माती टाकलेली आहे ही माती सिमेंट रस्ता करण्यास अडचण येत असेल तर ती काढून घेतली जाईल परंतु अगोदर पूर्ण रस्ता साफ करून घ्या, नाल्या स्वच्छ करा, पुढे आलेले सर्व अतिक्रमणे काढून घ्या असे म्हटल्यावर नगरसेवक रमेश चव्हाण यांचा 'इगो हर्ट' झाला आणि या रागाच्या भरात त्यांनी रस्ता करण्यास नकार देत सोबत आणलेल्या कार्यकर्त्या समोर मोरे कुटुंबीयांना धमकी दिली.
भविष्यात नगरसेवक रमेश चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्याकडून जाईबाई मोरे यांच्या कुटुंबाला जीविताचा धोका होईल ही बाब लक्षात घेता, त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी नगर परिषद बीड, नगराध्यक्ष बीड, एस. पी. ऑफिस बीड, यांना तक्रार अर्ज दिलेला आहे.
प्रश्न हा आहे की, एवढी मग्रुरी येथे कुठून? नगरसेवक हा जनतेचा सेवक असतो का? मालक?.
बीड
प्रतिनिधि - विश्वनाथ शरणांगत
___________