सामाजिक कार्यकर्ते सुदाम भोईर यांच्या मागणीची राष्ट्रीय महामार्ग विभागाने घेतली दखल...| मुरबाड माळशेज राष्ट्रीय महामार्ग लगत वाढलेले गवत तात्काळ काढून रस्ता केला मोकळा...!
गेल्या मार्च महिन्यापासून व संपूर्ण लॉकडावूनमध्ये कल्याण- मुरबाड माळशेज राष्ट्रीय महामार्गाच्या दूतर्फा मोठ्या प्रमाणात गवत माजले होते. या माजलेल्या गवतामुळे अनेक वाहनचालकांना या महामार्गावरून जाताना समोरून येणारी वाहने दिसत नसत.
सामाजिक कार्यकर्ते सुदाम भोईर यांच्या मागणीची राष्ट्रीय महामार्ग विभागाने घेतली दखल...
मुरबाड माळशेज राष्ट्रीय महामार्ग लगत वाढलेले गवत तात्काळ काढून रस्ता केला मोकळा...!
गेल्या मार्च महिन्यापासून व संपूर्ण लॉकडावूनमध्ये कल्याण- मुरबाड माळशेज राष्ट्रीय महामार्गाच्या दूतर्फा मोठ्या प्रमाणात गवत माजले होते. या माजलेल्या गवतामुळे अनेक वाहनचालकांना या महामार्गावरून जाताना समोरून येणारी वाहने दिसत नसत. त्यामुळे या महामार्गावर अपघात होण्याची शक्यता बळावली होती.कधी- कधी या माजलेल्या गवतातून साप, विंचू किंवा अनेक कीटक बाहेर येत असत. त्यामुळे रात्री या रस्त्यातून पायी चालताना भीती वाटत असे. माजलेल्या गवतामुळे हा संपूर्ण महामार्ग अरुंद झाला होता. या समस्येकडे जातीने लक्ष घालून रायते गावातील जागृत तरुण युवा कार्यकर्ते व आदर्श मित्र मंडळाचे अध्यक्ष सुदाम भोईर यांनी तात्काळ राष्ट्रीय महामार्ग विभागाला कळविले.
सुदाम भोईर यांच्या मागणीनुसार तात्काळ राष्ट्रीय महामार्ग विभागाने रायते गावाजवळील या राष्ट्रीय महामार्गावरील माजलेले गवत काढून हा रस्ता मोकळा केला. यावेळी सुदाम भोइर यांनी ही समस्या सोडविल्याबद्दल राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या शेख मॅडम, कर्मचारी लक्ष्मण घावट, गुरुनाथ टेंभे,भगवान बांगर यांचे मनापासून आभार मानले.रायते गावची प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या आदर्श मित्र मंडळाचे अध्यक्ष सुदाम भोईर व त्यांचे सहकारी वकील मनोज सुरोशी, संतोष सुरोशी, नितीन भोइर,संतोष मंगल भोइर यांचे संपूर्ण रायते गावातून अभिनंदन होत आहे.
मुरबाड
प्रतिनिधी - लक्ष्मण पवार
__________