नर्हेगावमध्ये आश्चर्यचकित करणारी घटना हॉटेल चालकाचा खून

नर्हेमध्ये हॉटेल चालकाचा खून

नर्हेगावमध्ये आश्चर्यचकित करणारी घटना  हॉटेल चालकाचा खून
narhe-murder-14.06.2020

नर्हेगावमध्ये आश्चर्यचकित करणारी घटना  हॉटेल चालकाचा खून

नर्हेगाव-

अज्ञात कारणावरून नर्हे परिसरात एका इसमाच्या डोक्यात धारदार हत्याराने वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. सुनील बारकु लांगोरे (वय 45, रा. अभिनव कॉलेज रस्ता, नर्हे, मूळ नांदोशी, ता. हवेली, पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून, ही घटना सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.
सुनील लांगोरे यांचा नर्हे परिसरात छोटासा हॉटेल व्यवसाय असून, त्याचबरोबर ते गॅसच्या टाक्या पुरविण्याचे काम करीत असत. सध्या लॉकडाउनमुळे हॉटेल व्यवसाय बंद असला, तरी ते हॉटेलच्या आवारात गॅसच्या पावत्या बनविणे, तसेच गॅस घरपोच देण्याचे काम करीत असत. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब मूळ गावी नांदोशी या ठिकाणी गेले होते. सायंकाळी सहाच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने त्या ठिकाणी येऊन अज्ञात कारणावरून त्यांच्या डोक्यात धारदार हत्यारांनी वार केले. ह्यात ते गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके यांनी घटनास्थळी भेट दिली.