मुरबाड ग्रामीण रुग्णालयात सुखरुप जुळे..! | आदीवासी महिलेची सुखरूप जुळ्यांना जन्म..! | किचकट बाळंतपण डॉक्टरांनी केले सहज..!

मुरबाड सरकारी दवाखाण्यात एका आदिवासी महिलेने आज नवजात जुळ्यांना जन्म दिला. किचकट बाळंतपण असतांना मुरबाडच्या ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी हे बाळंतपण शर्थीने सुखरूप केले असून दोन्ही मुलगे बाळे सुदृढ असून त्यांच्या आईची प्रकृती एकदम चांगली असल्याची माहिती मिळाली आहे.

मुरबाड ग्रामीण रुग्णालयात सुखरुप जुळे..! |  आदीवासी महिलेची सुखरूप जुळ्यांना जन्म..! |  किचकट बाळंतपण डॉक्टरांनी केले सहज..!
Safe twins at Murbad Rural Hospital ..! | Tribal woman gives birth to happy twins ..! | Complicated childbirth was easily done by a doctor ..!
मुरबाड ग्रामीण रुग्णालयात सुखरुप जुळे..! |  आदीवासी महिलेची सुखरूप जुळ्यांना जन्म..! |  किचकट बाळंतपण डॉक्टरांनी केले सहज..!
मुरबाड ग्रामीण रुग्णालयात सुखरुप जुळे..! |  आदीवासी महिलेची सुखरूप जुळ्यांना जन्म..! |  किचकट बाळंतपण डॉक्टरांनी केले सहज..!

मुरबाड ग्रामीण रुग्णालयात सुखरुप जुळे..!

आदीवासी महिलेची सुखरूप जुळ्यांना जन्म..!

किचकट बाळंतपण डॉक्टरांनी केले सहज..!

मुरबाड सरकारी दवाखाण्यात एका आदिवासी महिलेने आज नवजात जुळ्यांना जन्म दिला. किचकट बाळंतपण असतांना मुरबाडच्या ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी हे बाळंतपण शर्थीने सुखरूप केले असून दोन्ही मुलगे बाळे सुदृढ असून त्यांच्या आईची प्रकृती एकदम चांगली असल्याची माहिती मिळाली आहे.

 तालुक्यातील व्यापारी मानिवली येथील आदिवासी कुटुंबातील लक्ष्मी हिलम वय ३० या गर्भवती महिलेला मुरबाडच्या सरकारी ग्रामीण रुग्णालयात बाळंतपणा साठी ऍडमिट केले होते.या महिलेला पहिले दोन मुली असताना हे तिसरे बाळंतपण  होते.

मुरबाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.वाठारे व डॉ. हेमंतकुमार खंबायत यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विक्रांत गुजर, डॉ. स्नेहल, परिचारिका सुगंधा विशे, मावशी आरती व कांताबाई देसले यांनी या आदिवासी महिलेच्या पायाळू जुळ्या बाळांचे अत्यंत सुखरूप बाळंतपण करून सरकारी दवाखान्यात यशस्वी सुखरूप डिलीव्हरी होते याचे उदाहरण दिले आहे.

सिझरच्या युगात प्रायव्हेट दवाखान्यात सर्वसामान्य गोरगरीब आदिवासी रुग्णांना हजारो रुपयांचा आर्थीक भुर्दंड सहन करावा लागत असताना सरकारी दवाखान्यात अडचणीची असताना नैसर्गिक साध्या सोप्या उपचारात दोन पायाळू जुळ्या बाळांना सुखरूप जन्म देऊन एका आदिवासी महिला व दोन्ही बाळांना सुखरूप उपचार करणाऱ्या डॉक्टर व वैद्यकीय स्टाफचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

मुरबाड , ठाणे 

प्रतिनिधि - लक्ष्मण पवार

__________