मुंबई ठाण्यात 4 - 5 दिवसांत मुसळदार पाऊस पडण्याचा इशारा ...| Warning of heavy rain in Mumbai Thane in 4-5 days ...| mumbai rain update..

mumbai rain update : पुढच्या चार ते पाच दिवसात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारपासून जोरदार पाऊस होईल.

मुंबई ठाण्यात 4 - 5  दिवसांत मुसळदार पाऊस पडण्याचा इशारा ...| Warning of heavy rain in Mumbai Thane in 4-5 days ...| mumbai rain update..
आज आणि उद्या मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली (Mumbai Maharashtra Rain Update) आहे.

mumbai rain update :

मुंबई ठाण्यात 4 - 5  दिवसांत मुसळदार पाऊस पडण्याचा इशारा ...

पुढच्या चार ते पाच दिवसात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारपासून जोरदार पाऊस होईल. घाट भागात तर अति मुसळधार पावसाची शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणेकर हे उकाड्याने हैराण झाले आहेत. अशात ही बातमी या सगळ्यांनाच दिलासा देणारी ठरली आहे. सगळेच जण पावसाची चातकासारखी वाट बघत आहेत.

मुंबई : बंगालच्या उपसागरात ४ ऑगस्टच्या आसपास कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. हवामानातील या बदलामुळे मुंबई, कोकण आणि मध्य महराष्ट्रासह घाट माथ्यावर पावसाचा जोर वाढेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यातही बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

२ ऑगस्ट रोजी मुंबई, रायगड, पुणे, सातारा, औरंगाबाद, बीड, लातूर, उस्माबाद मध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. तर सिधुदुर्ग, कोल्हापूर आणि रत्नागिरीमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल.

३, ४ आणि ५ ऑगस्ट रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, साता-यासह मराठवाड्यातील काही जिल्हयांत तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, अशीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. या काळात किनारी प्रदेशात वेगाने वारा वाहील. समुद्र खवळलेला राहील. मच्छिमारांनी समुद्रात उतरु नये, असे आवाहन करण्यात आले आहे.